मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'दादा, तुमच्या शब्दावर आम्ही...', नगरमध्ये अडवला अजित पवारांचा ताफा!

'दादा, तुमच्या शब्दावर आम्ही...', नगरमध्ये अडवला अजित पवारांचा ताफा!

Jul 15, 2022, 03:05 PM IST

    • Ajit Pawar News : भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्हातील अकोलेत विरोधी पक्षनेते अजित पवारांचा ताफा काही वेळ अडवून धरला होता.
Ajit Pawar News (HT)

Ajit Pawar News : भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्हातील अकोलेत विरोधी पक्षनेते अजित पवारांचा ताफा काही वेळ अडवून धरला होता.

    • Ajit Pawar News : भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्हातील अकोलेत विरोधी पक्षनेते अजित पवारांचा ताफा काही वेळ अडवून धरला होता.

LOP Ajit Pawar In Nagar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सिताराम गायकर आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं धोतर फेडण्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. परंतु आता अकोले सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पिचडांची साथ सोडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत निवडणुक लढवत असलेले सिताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार अकोलेत आले होते.

त्यामुळं पवारांना या गोष्टीचा जाब विचारणार असल्याचं तालुक्यातील शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी सांगितलं होतं. त्यामुळं पोलिसांनी सावंत यांना सकाळीच ताब्यात घेतलं होतं. परंतु त्यांचे आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यांनी पवारांच्या वाहनांचा ताफा रोखत दादांनी शब्द पाळला नसल्यानं नाराजी व्यक्त केली. याशिवाय काही लोकांनी अजित पवारांना गायकर यांना पक्षात न घेण्याचीही विनंती केली.

वाहनाचा ताफा काही वेळ थांबलेला असल्यानं त्या ठिकाणी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पोलिसांनी आंदोलकांना हटवल्यानंतर पवारांचा ताफा पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या