मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोदींना भावलं मुख्यमंत्री शिंदेंचं 'ते' भाषण; म्हणाले, बाळासाहेबांच्या…

मोदींना भावलं मुख्यमंत्री शिंदेंचं 'ते' भाषण; म्हणाले, बाळासाहेबांच्या…

Jul 15, 2022, 02:22 PM IST

    • CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण PM नरेंद्र मोदींना चांगलंच भावलं असून त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.
CM Eknath Shinde Latest News (HT)

CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण PM नरेंद्र मोदींना चांगलंच भावलं असून त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.

    • CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण PM नरेंद्र मोदींना चांगलंच भावलं असून त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे.

CM Eknath Shinde Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत ५० बंडखोर आमदार आणि भाजपच्या पाठिंब्यावर बहुमत मिळवल्यानंतर जोरदार भाषण केलं होतं. यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. त्यांनी विधानसभेत केलेलं तडाखेबंद भाषण आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंनी याबाबत माहिती दिली असून भाषण ऐकल्यानंतर मोदींनी फोन केल्याचंही शिंदेंनी सांगितलं.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

याविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 'विधानसभेतील एक तास तेरा मिनिटांचं भाषण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऐकलेलं आहे, त्यानंतर त्यांनी मला फोन करत तुम्ही मनापासून भाषण केल्याचं सांगितलं, परंतु मी त्यांच्याशी बोलताना म्हणालो की खुप कागदं आणली होती, ते बाजूला ठेऊन बोललो, मी त्या दिवशी फक्त दहा टक्केच बोललेलो आहे, अजून ९० टक्के गोष्टी पोटात आहेत.' असं शिंदे म्हणाले.

याशिवाय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींसह केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले होते. त्यानंतर आता त्यांचं राज्याच्या राजकारणातील स्थान वाढत चालल्याचं बोललं जात आहे.

प्रत्येक MLA आता मुख्यमंत्री...

आपल्याला देशाचा आणि परिणामी महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आता हे सरकार स्थिर असून याला जनतेकडून मोठं समर्थन मिळत असल्याचं शिंदेंनी सांगितलं. याशिवाय आता मंत्रालयात तुमच्या हक्काचा माणूस बसला असून माझ्या ५० आमदारांना तुम्हीच मुख्यमंत्री असल्याचं वाटायला हवं, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

ते ५० आमदार शूर आहेत, असं मोदी म्हणालेत...

भारतीय जनता पक्षाकडं ११५ तर आमच्याकडं ५० आमदार आहेत. परंतु आमच्याकडं असलेले ५० लोक शूर असल्याचं मोदींनी सांगितल्याचं शिंदेंनी म्हणाले. ते सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक असून पाठिंबा त्यांनाच द्यायला हवा, त्यानंतर त्यांनी मला संधी दिली, असंही शिंदे यांनी नमूद केलं.

पुढील बातम्या