मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!

भाजप आणि फडणवीस ओबीसींच्या हक्कांचे मारेकरी; पटोलेंनी संस्थांची नावंच घेतली!

Dec 13, 2022, 05:07 PM IST

  • Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole - Devendra Fadnavis

Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

  • Nana Patole : ओबीसींच्या विकासात आणि आरक्षणात भाजप व देवेंद्र फडणवीस हे अडथळे आणत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Nana Patole : 'ओबीसी समाजानं भारतीय जनता पक्षाला भरघोस मतदान करून केंद्रात व राज्यात सत्ता दिली, पण भाजप व देवेंद्र फडणवीस हेच ओबीसींच्या न्याय हक्काचे खरे मारेकरी आहेत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून समांतर आरक्षण चालवलं जात आहे', असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपवर आरोप करताना त्यांनी 'महाज्योती' आणि 'ज्ञानदीप' संस्थांचे दाखले पटोले यांनी दिले. महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'महाज्योती'कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट या परीक्षांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. 'महाज्योती'नं एमपीएससीच्या ऑफलाइन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसमोर 'ज्ञानदीप' या एकमेव प्रशिक्षण संस्थेचा पर्याय दिला आहे. मात्र, राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी विभागानं पुण्यातील 'ज्ञानदीप' संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचं प्रस्तावित केलं आहे. यातून नेमका कोणाचा फायदा करून दिला जाणार आहे? वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना २०० टक्के शुल्कवाढ कोणाच्या सांगण्यावरून केली? महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना 'ज्ञानदीप'वरच विशेष मेहेरबानी का? असा सवाल पटोले यांनी केला.

'भाजप ओबीसी समाजाच्या कल्याणकारी योजनांमध्ये अडथळा आणत असतो. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलतीही मिळू दिल्या जात नाहीत. महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातील मुलांना चांगल्या संधी मिळायला पाहिजेत, पण भाजप ओबीसी समजातील विद्यार्थ्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यूपीएससीची परीक्षा न घेताच एका विशिष्ट समाजातील मुलांना थेट सहसचिव पदावर नियुक्ती देऊन ओबीसी व इतर मागास जातींच्या मुलांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. 'महाज्योती'ला भ्रष्टाचाराचं कुरण बनवून शिंदे-फडणवीस सरकारनं ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे हक्क हिरावून घेऊ नयेत, असा इशारा पटोले यांनी दिला.

राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षणही भाजप व फडणवीस यांच्या आडमुठेपणामुळंच गेलं. राज्य ओबीसी आयोगाची स्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. भाजपला आरक्षणच नको असल्यानं ते विविध मार्गानं ते संपवण्याचं काम करत आहे. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय या ओबीसी समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळणार नाहीत, असंही ते म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या