मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लायकी नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं; राज्यपालपद सोडताच कोश्यारींचा ठाकरेंवर पलटवार

लायकी नसताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं; राज्यपालपद सोडताच कोश्यारींचा ठाकरेंवर पलटवार

Feb 20, 2023, 07:51 PM IST

    • bhagat singh koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
bhagat singh koshyari on uddhav thackeray (HT)

bhagat singh koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

    • bhagat singh koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

bhagat singh koshyari on uddhav thackeray : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्र सोडून उत्तराखंडमध्ये रवाना झाले आहेत. रमेश बैस यांनी राज्यपालपदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झाल्यानंतर आता पुन्हा भगतसिंह कोश्यारी चर्चेत आले आहे. कारण आता त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'उद्धव ठाकरेंची लायकी नसतानाही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं', असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता कोश्यारींच्या नव्या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, उद्धव ठाकरेंची लायकी नसतानाही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शक व्यक्ती त्यांना वाचवू शकला नाही. मी राज्यपालपदावर असताना त्यांनी मला विमानातून खाली उतरवलं होतं, आता नियतीनंच त्यांना खुर्चीवरून खाली उतरवलं, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा करण्यात आलं होतं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी काहीही केलं नाही, त्यांच्यासोबत जे झालं ते नियतीनंच केलं असल्याचंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता राज्यपालपदाची इनिंग संपवल्यानंतर कोश्यारी या वक्तव्यानंतर थेट राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना ते उत्तराखंडमधील मसुरी येथील एका कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या विमानातून निघाले होते. त्यासाठी ते विमानात बसले असतानाही राज्य सरकारची संमती न मिळाल्यामुळं भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून खाली उतरावं लागलं होतं, त्यानंतर भाजपसह विरोधकांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली होती.

पुढील बातम्या