heat wave In maharashtra : येत्या ४८ तासांत म्हणजेच पुढील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
(HT)गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हळूहळू वाढत आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं सामान्यांची मोठी अडचण होणार आहे.
(REUTERS)भरदुपारी घराबाहेर पडणं टाळा आणि पाण्याची बाटली नेहमी सोबत घेऊन आरोग्याची खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
(HT)सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वात जास्त ऊन पडणार असल्यानं या वेळेत सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
(Yogendra Kumar)फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्तर भारतासह मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णता वाढली होती. त्यानंतर आता त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Ishant Kumar)