मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: नवऱ्यानं पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचं असं करणार नाही; सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला

Supriya Sule: नवऱ्यानं पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचं असं करणार नाही; सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला

Feb 26, 2024, 12:46 PM IST

    • Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Sunetra Pawar and Supriya Sule

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

    • Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Supriya Sule Slams Sunetra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अतीतटीची लढत पाहायला मिळू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना आव्हाने- प्रतिआव्हानेही दिले जात आहेत. नुकतेच बारामतीतील आमराई परिसरात सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार बॅनर झळकले. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना टोला लगावला आहे. नवऱ्यानं पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचं असं करणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Ajit Pawar letter : मी वेगळा निर्णय का घेतला? जनतेला खुलं पत्र लिहित अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट

सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्यात महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल तेच मला करायचे आहे. महागाई, बेरोजगाई अशा प्रश्नांवर बोलले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. तुमच्या सुखदुखात कोण असेल, अशाच लोकांना मतदान करा. मी जी मते मागतेय ती मेरिटवर मागतेय. सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरत आहे. माझी खासदारकी ही माझी आहे. यात माझ्या नवऱ्याने लुडबूड करण्याची गरज नाही. माझं आणि सदानंद यांचे तुमच्यासारखेच आहे. त्यांनी मुंबईतले बघायचे आणि मी इथले बघायचे. अशा लोकांना मतदान करा, जो स्वत: सभागृहात उभा राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"मी २००९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. पण त्याआधी २ वर्ष मतदार संघात फिरले. मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. मी लोकप्रतिनिधी आहे. कॉपी करून पास होणार नाही. नवऱ्याने पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचे असे करणार नाही. मी सुप्रिया सुळे आहे, स्वतः लिहेन आणि पास होईन, स्वतःच्या मेहनतीने", अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला.

पुढील बातम्या