मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  bacchu kadu : सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा, कारण काय?

bacchu kadu : सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा, कारण काय?

Aug 11, 2023, 11:22 AM IST

  • Bacchu kadu on Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

Bachchu Kadu on Sachin Tendulkar

Bacchu kadu on Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

  • Bacchu kadu on Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

Bacchu kadu on Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात 'प्रहार' संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीतून माघार न घेतल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही बच्चू कडू यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. ‘सचिन तेंडुलकर हे ऑनलाइन गेमिंगची जाहिरात करतात. सरकारनं त्यांना सूचना केल्या पाहिजेत. आंध्र प्रदेशात ’पेटीएम फर्स्ट' या गेमवर बंदी आहे, पण सचिन तेंडुलकर त्याची जाहिरात करतायत. मी स्वत: सचिन तेंडुलकर यांना व राज्य सरकारला पत्र दिलं आहे. ऑनलाइन गेमिंग प्रचंड धोकादायक आहे. इतर कोणी ही जाहिरात केली असती तर समजू शकलो असतो. पण वेबसाइटवरील जाहिरातीत सचिन दिसतात. ते भारतरत्न आहेत, हे थांबलं पाहिजे. सरकारचं नियंत्रण सुटलं तर काही खरं नाही, असा इशारा कडू यांनी दिला होता. त्यानंतर आता पुन्हा कडू या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत.

‘सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत, देशाचा अभिमान आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांनी स्वत: या संदर्भात खुलासा करायला हवा. त्यांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातीमधून माघार घ्यावी. अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल,’ असं कडू म्हणाले.

सचिन तेंडुलकर यांना सांगण्याचा दुसरा मार्ग काय असेल असं विचारलं असता बच्चू कडू यांनी आंदोलनाचे संकेत दिले. 'ऑनलाइन गेमिंगपासून भारतीयांची मुक्तता व्हावी म्हणून आम्ही त्यांना नारळपाणी देऊ. ऑनलाइन गेमिंग विषयी पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. सिगारेट, तंबाखूच्या पाकिटांवर धोकादायक असा इशारा दिलेला असतो. पण ती विकायचीच कशाला असा एक लोकांचा आक्षेप असतो. त्यामुळं ऑनलाइन गेमिंगच्या जुगारावर मुळापासून घाव घातला पाहिजे. यातून पैसे जाण्याचा मोठा धोका आहे, असं बच्चू कडू म्हणाले. अनेक राज्यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. आपणही तो निर्णय घेतला पाहिजे, असंही कडू म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या