मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘भाऊ मुख्यमंत्री होताच ह्यांना त्रास सुरू झाला’; खासदार संजय राऊतांचा घणाघात

‘भाऊ मुख्यमंत्री होताच ह्यांना त्रास सुरू झाला’; खासदार संजय राऊतांचा घणाघात

May 05, 2022, 09:34 PM IST

    •  पुण्यातील सभेत जोरदार फटकेबाजी : बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या ते आज बाळासाहेब समजून सांगत असाल्याची राज ठाकरे यांच्यावर केली टीका
खासदार संजय राऊत (HT_PRINT)

पुण्यातील सभेत जोरदार फटकेबाजी : बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या ते आज बाळासाहेब समजून सांगत असाल्याची राज ठाकरे यांच्यावर केली टीका

    •  पुण्यातील सभेत जोरदार फटकेबाजी : बाळासाहेबांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या ते आज बाळासाहेब समजून सांगत असाल्याची राज ठाकरे यांच्यावर केली टीका

पुणे : गेल्या १५ वर्षांत यांना भोंग्याच त्रास झाला नाही. मात्र, आज भाऊ मुख्यमंत्री झाला की यांना त्रास कसा सुरू झाला ? असा सवाल करत तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले, जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी बाळासाहेबांना जिंवतपणी यातना दिल्या ते आम्हाला बाळासाहेब सांगताहेत? अशी जोरदार फटकेबाजी करत खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

खासदार संजय राऊत यांची आज पुण्यातील हडपसर येथे जाहिर सभा झाली. या सभेत माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार विजय शिवतरे तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, काही लोक सध्या राज्य पेटवापेटवीची भाषा वापरत आहे. मात्र, पेटवापेटवीची भाषा कोण करतंय ? आरे आमचं आख्ख आयुष्य या पेटवापेटवीत गेले. ‘सवाल ये नही की बस्तीयां क्यो जली गई, सवाल ये है की बंदर के हाथ मे माचिस किसने दिया. यांना माचिस दिली तरी हे पेटायला तयार नाही. कारण दारुगोळा जर शिवसेनेकडे असेल तर हे कसे काय पेटणार ? असा सवाल राऊत यांनी केला. राऊत म्हणाले, पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले. हा महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे.

संजय राऊत म्हणाले, हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे. या राज्याला छत्रपतींचा, फुले, शाहू आंबेडकरांचा, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. या राज्याला पहिला ब्राम्हण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. तर बॅरिस्टर अंतुले हे मुस्लिम मुख्यमत्री बाळासाहेबांच्या जवळचे आणि लाकडे होते.

राज्यपाल आणि किरीट सोमय्या यांचा समाचार घेत राऊत म्हणालेआयएनएस विक्रांतमध्ये एका महाभागाने पैसे जमा केले. राजभवन ही भाजपची शाखा झाली आहे. जर पैसे जमा झाले नाही तर तो फरार का झाला ? याला जेल मध्ये पाठवणार त्याला जेलमध्ये पाठवणार अरे जेल तुझा बापाची आहे का? स्वत: शेण खायचं आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायचा. मला अभिमान आहे पुणेकरांचा की महापालिका पायरीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मनगटातील ताकद दाखवली, असेही राऊत म्हणाले.

पुढील बातम्या