मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andheri East By Election : ‘या’ कारणामुळे शिंदे गट नाही तर भाजप लढणार अंधेरी पूर्व पोटनिवडणूक!

Andheri East By Election : ‘या’ कारणामुळे शिंदे गट नाही तर भाजप लढणार अंधेरी पूर्व पोटनिवडणूक!

Oct 03, 2022, 10:48 PM IST

    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक (Andheri east by election ) भाजपच लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडेनिवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक (Andheri eastby election ) भाजपच लढविणार आहे.या निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक (Andheri east by election ) भाजपच लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

मुंबई–भारतीय निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri east assembly seat) मतदार संघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली. यामुळे शिंदे गट व शिवसेनेचा पहिला सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील तीन नोव्हेंबरला होणारी पोटनिवडणूक (Andheri eastby election ) भाजपच लढविणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाने आणि भाजप लढल्यास उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेईल.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६,९६५ मतांनी पराभव केला,तरी ४५,८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. मुरजी पटेल यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. लटके यांचा १२ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिंदे गट त्यासाठी दावा करत आहेत. लटके यांचे मुख्य मंत्री शिंदे यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढू नये,असा मतप्रवाह शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडे सध्या निवडणूक चिन्ह नाही. शिवसेनेवर व शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह्यावर कुणाचा अधिकार याचा निर्णय निवडणूक आयोग करणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी यावर निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या जागेवर भाजपकडून उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.शिवसेना फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी उंचावेल. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढण्याचा वरिष्ठ भाजप नेत्यांचा आग्रह आहे.

 

पुढील बातम्या