मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar Crime : कौटुंबिक वादातून डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या

Ahmednagar Crime : कौटुंबिक वादातून डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या

Feb 19, 2024, 07:12 PM IST

  • Ahmednagar Crime : किरकोळ वादातून डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना कोपरगाव येथे घडली आहे.

Ahmednagar crime

Ahmednagar Crime : किरकोळ वादातून डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना कोपरगाव येथे घडली आहे.

  • Ahmednagar Crime : किरकोळ वादातून डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना कोपरगाव येथे घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याचा प्रहार करून तिची हत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा शिवारात घडली. हातोड्याचा घाव वर्मी बसल्याने पत्नी जागीच गतप्राण झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

पूजा अरुण दाभाडे असे मृत महिलेचे नाव आहे. जेऊर पाटोदा शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मृत पूजा व अरुण हे दाम्पत्य जेऊर पाटोदा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रहात होते. आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्यातरी कारणाने भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात अरुणने पूजाच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला. यात पूजाचा मृत्यू झाला आहे.  

या घटनेची सूचना परिसरातील नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दाम्पत्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला व महिलेची हत्या कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या