मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Road Accident : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक शंभर फूट दरीत कोसळला; चालकाला वाचवण्यात यश

Road Accident : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक शंभर फूट दरीत कोसळला; चालकाला वाचवण्यात यश

Nov 30, 2022, 08:35 AM IST

    • Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यानंतर एक ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai-Pune Expressway Accident (HT)

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यानंतर एक ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

    • Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यानंतर एक ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अपघाताची मालिका अजूनही कायम आहे. आता एक्स्प्रेस वे वर तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला असून त्यात एक ट्रक रस्त्याच्या कडेला शंभर फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. ट्रकच्या चालकाला खोल दरीतून वाचवण्यात यश आलं असून या भीषण अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील बोरघाटात तीन वाहनांनी एकमेकांना जोरदार घडक दिली. त्यामुळं एक अपघातग्रस्त ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये चालक असल्यानं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी मदत व बचावकार्य सुरू केलं. बोरघाटात मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावरील उतारावर हा भीषण अपघात झाला असून अपघातग्रस्त ट्रकमधून चालकाला वाचवण्यात यंत्रणांना यश आलं आहे.

या विचित्र अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे महामार्गावर सातत्यानं अपघातांची मालिका सुरुच आहे. यापूर्वी शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे आणि टाटा समूहाचे माजी चेयरमन सायरस मिस्त्री यांचाही मुंबई-पुणे मार्गावर झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला होता.

पुढील बातम्या