मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BAMU Rape Case : प्राध्यापकानेच केला विद्यार्थीनीवर बलात्कार, मराठवाडा विद्यापीठातील संतापजनक घटना

BAMU Rape Case : प्राध्यापकानेच केला विद्यार्थीनीवर बलात्कार, मराठवाडा विद्यापीठातील संतापजनक घटना

Apr 26, 2023, 12:48 PM IST

    • BAMU Rape Case Sambhajinagar : प्राध्यापकानेच तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना मराठवाडा विद्यापीठातून समोर आली आहे.
BAMU Rape Case Sambhajinagar (HT_PRINT)

BAMU Rape Case Sambhajinagar : प्राध्यापकानेच तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना मराठवाडा विद्यापीठातून समोर आली आहे.

    • BAMU Rape Case Sambhajinagar : प्राध्यापकानेच तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना मराठवाडा विद्यापीठातून समोर आली आहे.

BAMU Rape Case Sambhajinagar : बाहेरील जिल्ह्यातून विद्यापीठात आलेल्या विद्यार्थीनीवर प्राध्यापकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. अशोक गुरप्पा बंडगर असं आरोपी प्राध्यापकाचं नाव असून तो मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहे. घटनेचा भांडाफोड झाल्यानंतर आता पोलिसांनी आरोपी बंडगरसह त्याच्या पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Local Train news : ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

Akola Crime : अकोल्यात आरोपीला गंभीर मारहाण! पार्श्वभागात दांडा टाकला, आरोपीचा कोठडीतच मृत्यू; पाच जणांची बदली

Beed Murder : बीड हादरले! कौटुंबिक वादातून उशीने तोंड दाबून पत्नीला संपवले, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी ३० वर्षीय पीडिता बाहेरच्या जिल्ह्यातून आली होती. त्यावेळी तिची विद्यापीठातील प्राध्यापक अशोक बंडगर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी बंडगरने पीडितेला मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यापीठात पेईंग गेस्ट राहण्याची संधी देत आरोपी बंडगरने तिच्यावर सातत्यानं बलात्कार केला. पीडितेने यासाठी विरोध केला असता आरोपीने तिला धमकावत अत्याचार सुरूच ठेवला. या घाणेरड्या कृत्यासाठी आरोपी बंडगरच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली. त्यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराबाबत पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला आहे.

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ११ वर्षांच्या मुलीची हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या

आरोपी बंडगरने सातत्यानं बलात्कार केल्यामुळं विद्यार्थीनीची प्रकृती खालावली. त्यानंतर आरोपीने तिला ढिंबरगल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु या प्रकरणाची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी देखील संभाजीनगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपी अशोक बंडगर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने विद्यापीठातील विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली होती. समितीने आरोपीला नोटीस पाठवल्यानंतर बंडगरने विद्यार्थीनीला तिच्या गावी जाऊन धमकी दिल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

पुढील बातम्या