Kejriwal House Row : केजरीवालांच्या बंगल्यावर तब्बल ३० कोटींचा खर्च; असं आहे काय त्यात?
Arvind Kejriwal Bungalow Row : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यावर झालेल्या कोट्यवधींच्या खर्चावरून राजकीय घमासान सुरू आहे.
Delhi CM House Row : भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा दावा करत गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेले आता त्याच मुद्द्यावरून गोत्यात आले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगात असताना आता खुद्द केजरीवाल सरकारी पैशाच्या उधळपट्टीवरून वादात अडकले आहेत. केजरीवालांनी त्यांच्या बंगल्यावर तब्बल ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. बंगल्यातील खिडक्यांचेही पडदेही लाखांच्या घरातील आहेत. आम आदमी पक्षानं स्वत: हा खर्च झाल्याची कबुली दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांनुसार काल एका वृत्तवाहिनीनं केजरीवालांच्या बंगल्यावरील खर्चाचा तपशील जाहीर केला होता. त्यानुसार, बंगल्याच्या नुतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात आलं होतं. हे वृत्त प्रसिद्ध होताच भाजप व काँग्रेसनं केजरीवालांना घेरलं आहे. आम आदमी पक्षानं ३० कोटी रुपये खर्च झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र, भाजपवर उलट आरोप करून बचावाचाही प्रयत्न केला आहे.
Karnataka election : ७० वर्षांत देशातील लोकशाही वाचवली; तुम्हाला पंतप्रधान केलं, काँग्रेसचं भाजपला प्रत्युत्तर
हा बंगला ८० वर्षे जुना आहे. त्याचे छत तीन वेळा कोसळले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुचनेवरून आणि गरजेनुसारच त्यातील काम करण्यात आलं आहे, असं 'आप'नं म्हटलं आहे. अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर चर्चा होत असल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना आणि पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानावरील खर्चाचेही आकडे जाहीर करा, असं आव्हान 'आप'नं दिलं आहे. दिल्लीतील नायब राज्यपालांच्या घराच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावाही त्यांनी केला. तसंच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांच्यासाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टरची किंमतही संजय सिंह यांनी जाहीर केली.
केजरीवालांच्या बंगल्यात कशावर किती खर्च?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांनुसार, केजरीवालांच्या बंगल्यावरील एकूण खर्चापैकी ११.३० कोटी रुपये इंटेरिअर डिझायनिंगवर खर्च करण्यात आले आहेत. विशिष्ट प्रकारचे दगड आणि मार्बलवर ६.०२ कोटी खर्च करण्यात आले. हे मार्बल व्हिएतनामचे असल्याचं सांगितलं जातं. अंतर्गत सजावटीसाठी सल्लागारास १ कोटी रुपये देण्यात आले. इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी २.५८ कोटी, अग्निशमन व्यवस्थेसाठी २.८५ कोटी, वॉर्डरोब आणि अॅक्सेसरीज फिटिंगासाठी १.४१ कोटी आणि किचनमधील साहित्यासाठी १.१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर २०२० ते जून २०२२ या कालावधीत ही रक्कम सहा हप्त्यांमध्ये खर्च केल्याचं कागदपत्रं दाखवतात.
विभाग