मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loni Kalbhor Firing : पुण्यात काका-पुतण्याचा वाद पेटला, कौटुंबिक वादातून तुफान गोळीबार

Loni Kalbhor Firing : पुण्यात काका-पुतण्याचा वाद पेटला, कौटुंबिक वादातून तुफान गोळीबार

Aug 16, 2023, 11:05 AM IST

    • Pune Crime News : किरकोळ कारणावरून काकाने चक्क पुतण्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Loni Kalbhor Firing (HT)

Pune Crime News : किरकोळ कारणावरून काकाने चक्क पुतण्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Pune Crime News : किरकोळ कारणावरून काकाने चक्क पुतण्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Loni Kalbhor Crime News Marathi : मुंबईत तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आरोपी काकाने पुतण्यावर थेट गोळीबार करत खळबळ उडवून दिली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावात ही घटना घडली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती आहे. प्रदीप जाधव असं आरोपीचं नाव असून विकास जाधव असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी प्रदीपने विकासवर तीन गोळ्या झाडल्या असून सुदैवाने या घटनेत त्याला जीव गमवावा लागलेला नाही. परंतु गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेने लोणी काळभोर गावात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या गावात प्रदीप जाधव यांचं पुतण्या विकास जाधव यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद होत होते. कौटुंबिक कलह आणि अन्य कारणावरून दोघांमध्ये खटके उडत असल्याने अनेकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, शिवीगाळ झाल्यानंतर दोघांनी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी प्रदीप जाधव यांनी पुतण्या विकासवर तीन गोळ्या झाडत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने विकासला एकही गोळी लागली नाही, त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आरोपी प्रदीप जाधव यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु पुतण्यावर जीवघेणा हल्ला केल्यामुळं लोणी काळभोर पोलिसांनी प्रदीप जाधव याला अटक करत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रदीपने विकासच्या विरुद्ध दिशेने तीन गोळ्या झाडल्या आहे. परंतु वेळीच सावधान झाल्याने विकासने तिन्ही फायर चुकवत घटनास्थळावर पळ काढला. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. गावात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने लोणी काळभोर येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे हे करत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या