मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime News : डेटिंग अ‍ॅपवरून झाली ओळख; लग्नाचं आमिष दाखवून महिलेला लाखोंचा गंडा

Mumbai Crime News : डेटिंग अ‍ॅपवरून झाली ओळख; लग्नाचं आमिष दाखवून महिलेला लाखोंचा गंडा

Sep 20, 2022, 01:47 PM IST

    • Mumbai crime news marathi : मुंबईच्या सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला आरोपीनं डेटिंग अ‍ॅपवरून ओळख करून लाखोंना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
mumbai crime news marathi (HT)

Mumbai crime news marathi : मुंबईच्या सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला आरोपीनं डेटिंग अ‍ॅपवरून ओळख करून लाखोंना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

    • Mumbai crime news marathi : मुंबईच्या सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेला आरोपीनं डेटिंग अ‍ॅपवरून ओळख करून लाखोंना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Santacruz mumbai crime news marathi : डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झालेल्या एका पुरुषानं महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ५७ वर्षीय पीडित महिलेची आरोपी विनीत शहासोबत अ‍ॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर ते अनेकदा डेटवरही गेले होते. महिलेच्या नातेवाईकांची भेट घेऊन आरोपीनं तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिलेची सोनसाखळी आणि तिच्याकडील काही रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर! २४ तासात वीज कोसळल्यामुळे ५ ठार; साताऱ्यात ईव्ही दुचाकीवर कोसळली वीज

Maharashtra Weather Update : चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळी पावसाचे सावट! 'या' मतदार संघात मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Police: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, गृह खात्याचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका ५७ वर्षीय महिलेची डेटिंग अ‍ॅपवर काही दिवसांपूर्वी आरोपी विनीत शाहसोबत मैत्री झाली होती. त्यावेळी आरोपीनं महिलेला तो गेल्या २५ वर्षांपासून अमेरिकेत राहत असल्याचं आणि तिथं त्याचं रेस्टॉरंट असल्याचं सांगितलं. आरोपीनं घटस्फोट झाल्याचं सांगत महिलेशी प्रेमसंबंध निर्माण केले.

आरोपी विनीत शाहने एके दिवशी खर्चासाठी काही पैसे हवे असल्याचं सांगून महिलेकडून ४० हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर वाढदिवस असल्याचं सांगून महिलेकडून टॅब गिफ्ट म्हणून घेतला. याशिवाय त्यानं महिलेकडून ज्वेलरीमध्ये गुंतवण्यासाठी एक लाख रुपये घेतले. मोबाईल घेण्यासाठीही १५ हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेनं आरोपी शाहला लग्न करण्यासाठी सांगितल्यानंतर तो त्यानं त्याला नकार देत पळ काढला.

त्यानंतर पीडित महिलेला तिची आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. वेगवेगळ्या प्रकारे महिलेकडून साडेतीन लाख रुपये उकळून आरोपी पसार झाल्यानंतर महिलेनं मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विनीत शहा विरोधात एफआयआर दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या