मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gulabrao Patil : ‘ठाकरेंचा मेळावा मिक्स विचारांचा, आमच्या मेळाव्याला बाळासाहेबांचा आत्मा येणार’
Shivena vs Shinde Group On Dasra Melava 2022
Shivena vs Shinde Group On Dasra Melava 2022 (Anshuman Poyrekar/HT PHOTO)

Gulabrao Patil : ‘ठाकरेंचा मेळावा मिक्स विचारांचा, आमच्या मेळाव्याला बाळासाहेबांचा आत्मा येणार’

20 September 2022, 11:24 ISTAtik Sikandar Shaikh

Dasra Melava 2022 : जसजसा दसरा मेळावा जवळ येत आहे, तसा शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षाला धार येत आहे. त्यातच आता मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Shivena vs Shinde Group On Dasra Melava 2022 : शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून सुरू झालेला वादानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनीही परवानगी मिळो अथवा न मिळो, मेळावा शिवाजी पार्कवर होणार, अशी भूमिका घेतलेली आहे. त्यातच आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिंदे गटाचा मेळावा हा हिंदुत्त्वाच्या विचारांचा आहे, परंतु उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मिक्स विचारांचा आहे, आमचा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल, गेली अडीच वर्ष आम्ही हिंदुत्त्वाच्या विचारापासून दूर गेलो होतो, परंतु आता हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी आम्ही परत भगवा झेंडा हाती घेतल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला आहे.

दरम्यान आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला अजून कुठलंही मैदान मिळालेलं नाही. दादरमधील शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून शिवसेना आणि शिंदे गटानं अर्ज दाखल केले होते. परंतु त्यावर अजून बीएमसीनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी, यासाठी दोन्ही गटांनी अर्ज केला होता. त्यानंतर एमएमआरडीएनं शिवसेनेचा अर्ज नाकारत शिंदे गटाला मेळाव्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट ठाकरेंवर टीका केल्यानं दोन्ही गटातील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.