मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete : मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला, विनायक मेटे यांचं अपघाती निधन!

Vinayak Mete : मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला, विनायक मेटे यांचं अपघाती निधन!

Aug 14, 2022, 08:33 AM IST

    • Vinayak Mete Passed Away : आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे.
Vinayak Mete Passed Away In Car Accident (HT)

Vinayak Mete Passed Away : आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे.

    • Vinayak Mete Passed Away : आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे.

Vinayak Mete Passed Away In Car Accident : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर त्यांच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. त्यामुळं आता बीड जिल्ह्यापासून मुंबईच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या नेत्याचा अंत झाल्यानं राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

कोण आहेत विनायक मेटे?

विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातून येतात, त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी नेहमी प्रखर भूमिका घेतली होती. सलग पाच वेळा ते विधानपरिषदेचे आमदार होते, मराठी अस्मिता आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी वेळोवेळो भूमिका घेतलेली होती.

विनायक मेटेंनी राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते, राष्ट्रावादीनं त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाबाबात पक्षाशी वेगळी भूमिका घेत शिवसंग्राम पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांच्या शिवसंग्राम पक्षानं भाजपला पाठिंबा दिला होता.

मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची केली होती मागणी...

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी वातावरण तयार करण्याचं काम नेहमी विनायक मेटे यांनी केलं होतं. याशिवाय मराठवाड्यात ते एक मोठे मराठा नेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात स्मारक व्हावं, ही सुद्धा विनायक मेटेंचीच मागणी होती. तात्कालीन फडणवीस सरकारनं या प्रकल्पाला मंजुरीही दिली होती. याशिवाय मेटे यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं अध्यक्ष करण्यात आलं होतं. या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

त्यामुळं आता राज्यातील एक कार्यक्षम आमदार, मराठा नेता आणि विविध प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारा राजकीय नेत्याचा कार अपघातात निधन झाल्यानं राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या