मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 14 August 2022 Live: विनायक मेटे यांच्या अपघातास कारणीभूत ट्रक चालकास गुजरातमधून अटक
विनायक मेटे

Marathi News 14 August 2022 Live: विनायक मेटे यांच्या अपघातास कारणीभूत ट्रक चालकास गुजरातमधून अटक

Aug 14, 2022, 09:33 PMIST

Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 14, 2022, 08:13 PMIST

CM Eknath Shinde : जळगावात CM शिंदेंचं कार्यालय उभारणार; गुलाबराव पाटलांची घोषणा!

Gulabrao Patil CM Eknath Shinde : आज राज्यातील १८ नवनिर्वाचित मंत्र्यांचं खातेवाटप करण्यात आलं आहे. त्यात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांना त्यांना मविआ सरकारमध्ये देण्यात आलेलं पाणीपुरवठा खातं कंटिन्यू करण्यात आलं आहे. खातेवाटप झाल्यानंतर जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मध्यवर्ती कार्यालय उभारणार असल्याची घोषणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

Aug 14, 2022, 04:32 PMIST

मेटेंचे पार्थिव आज बीडला नेण्यात येणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन झाले. मेटेंच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर अपघात झाला होता.  मेटेंचं पार्थिव वडाळ्यातील निवासस्थानी आणले असून दुपारी ४ वाजेपर्यंत वडाळ्यातील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. मेटेंचं पार्थिव अॅम्ब्युलन्सनं बीडला नेण्यात येणार असून  विनायक मेटेंवर उद्या दु. ३.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Aug 14, 2022, 02:45 PMIST

विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्यसरकार जबाबदार, संभाजीराजेंचा आरोप

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. अपघातानंतर त्यांना एक तासाने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे या सुविदा पुरवण्याची काय निमावली आहे असा प्रश्नही संभाजीराजेंनी केला.

Aug 14, 2022, 12:10 PMIST

Rakesh Jhunjhunwala : झुनझुनवालांनी असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा दिली-अमित शाह

Rakesh Jhunjhunwala Passed Away : प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर आता केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेअर मार्केटविषयी झुनझुनवाला यांना असलेला प्रचंड अनुभव आणि अमोघ ज्ञानामुळं असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळाल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी झुनझुनवाला यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Aug 14, 2022, 12:05 PMIST

vinayak mete: विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शविच्छेदनासाठी उशिर होत असल्यानं पार्थिव नेण्यास विलंब होत आहे. त्यांचे पार्थिव आज सांयकाळी बीडला नेण्यात येणार आहे.

Aug 14, 2022, 10:20 AMIST

Grenade Attack : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; एक पोलीस शहीद

Police Killed In Grenade Attack : देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला जात असतानाच आता जम्मू-काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात अतिरेक्यानं केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. ताहीर खान असं त्यांचं नाव असून ते पूंछ जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

Aug 14, 2022, 10:16 AMIST

Salman Rushdie Condition : सलमान रश्दींच्या प्रकृतीत सुधारणा; व्हेंटीलेटर काढलं!

Salman Rushdie Health Condition : जेष्ठ साहित्यिक आणि ‘मेव्हिल द सॅटॅनिक व्हर्सेस’चे लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता त्यांना व्हेंटीलेटरून काढण्यात आल्याची माहिती त्यांचे सहकारी लेखक आतिश तासीर यांनी ट्विटरवरून दिली आहे. मात्र ते अजूनही बोलू शकत नाहीये. शुक्रवारी अमेरिकेतील एका कार्यक्रमात कट्टरवादी युवकानं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Aug 14, 2022, 10:09 AMIST

Vinayak Mete Death : विनायक मेटेंचा अपघात की घातपात? सत्य समोर आणण्याची आबासाहेब पाटलांची मागणी!

Vinayak Mete Passed Away In Car Accident : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झाल्यानंतर आता यामागं नेमकी काय कारणं आहेत, याच्या चौकशीची मागणी केली जात आहे. बीडहून मुंबईला येत असताना आज पहाटे कार अपघातात त्यांचं निधन झालं आहे. दोन तास मेटेंना घेण्यासाठी रुग्णवाहिका आली नाही, त्यामुळं आज सकाळी त्यांच्यासोबत झालेला अपघात आहे की घातपात?, याची चौकशी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Aug 14, 2022, 09:35 AMIST

Vinayak Mete: विनायक मेटे आपल्यातून गेले यावर विश्वास बसत नाही : अजित पवार

विनायक मेटे आपल्यातून गेले यावर विश्वास बसत नाही. ते अखेरपर्यंत मराठा समाजासाठी लढत राहिले असंही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं.

Aug 14, 2022, 09:14 AMIST

भारताला अपघातमुक्त करणं हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली ठरेल - गडकरी

रस्ते अपघातात मृत्यू होतात, पण सर्वांनी संवेदनशील नागरीक व्हायला हवं. विनायक मेटे यांच्या अपघाताचं नेमकं कारण माहिती नाही पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे. तिच विनायक मेटे यांना श्रद्धांजली होईल. सर्वांनी काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे. घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही इश्वर चरणी प्रार्थना करतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Aug 14, 2022, 08:58 AMIST

रात्री सव्वादोन वाजता विनायक मेटेंचा फडणवीस यांना मेसेज

रात्री सव्वादोन वाजता मेसेज केला होता. मेसेजमध्ये म्हटलं होतं की, 'मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची बैठक बोलावलीय त्यासाठी येतो. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाइटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो.' त्यांचा हा मेसेज आज सकाळी मी वाचला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Aug 14, 2022, 08:57 AMIST

Vinayak Mete: मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला : मुख्यमंत्री शिंदे

मराठी समाजासाठी लढणारा नेता हरपला. आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला येत असताना त्यांचं निधन झालंय. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांची जी तळमळ होती, भावना होती त्यांच्या या भावनेसोबतच सरकार आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Aug 14, 2022, 08:54 AMIST

Vinayak Mete Passes Away: मोठ्या सामाजिक नेत्याला महाराष्ट्र मुकला : शरद पवार

विनायक मेटे यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, "आजची सकाळ ही धक्कादायक आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताची बातमी समजली. एका सामान्य शेतकरी कुटुंबात आलेले आणि कष्टाने आपले व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व निर्माण केले असे नेते होते. सामाजिक प्रश्नावर त्यांचं सर्वाधिक लक्ष असायचं. अत्यंत बारकाईने आणि अभ्यासू पद्धतीने लक्ष देणारे असे ते नेते होते. शिवस्मारक अरबी समुद्रात व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज अचानाक त्यांच्या अपघाती निधनाने त्यांचं निधन झालं. एका मोठ्या सामाजिक नेत्याला आज राज्य मुकलं आहे."

Aug 14, 2022, 08:26 AMIST

Vinayak Mete Passes Away: उपमुख्यमंत्री फडणवीस एमजीएम रुग्णालयात पोहोचले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एमजीएम रुग्णालयात पोहोचले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेहेसुद्धा रुग्णालयात पोहोचणार असल्याचे समजते.

Aug 14, 2022, 08:21 AMIST

Vinayak Mete Passes Away: मराठा आरक्षणासाठी लढणारा माणूस गेला : चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाविषयी सातत्यानं लढणारा फार मोठा माणूस गेला आहे. मोठी आणि न भरुन निघणारी ही पोकळी असल्याच्या भावना कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Aug 14, 2022, 08:07 AMIST

Vinayak Mete : आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन!

Vinayak Mete Passed Away : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचं कार अपघात निधन झाल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे साडेपाच वाजेदरम्यान त्यांच्या कारला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना चालकासह उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता मेटे यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 14, 2022, 07:46 AMIST

President Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला संबोधित करणार

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाला संबोधित करणार आहेत. देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.

Aug 14, 2022, 07:44 AMIST

Vinayak Mete: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या या अपघातात विनायक मेटे यांच्यासह बॉडीगार्ड आणि चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    शेअर करा