मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना काळाचा घाला; समृद्धी मार्गावर भीषण अपघातात एक ठार

Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना काळाचा घाला; समृद्धी मार्गावर भीषण अपघातात एक ठार

Nov 12, 2023, 07:19 AM IST

    • Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना समृद्धी महामार्गावर वाशिम जवळ कारंजा टोलनाक्यावर भीषण अपघात झाला. यात एक ठार तर तिघे जखमी झाले.
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना समृद्धी महामार्गावर वाशिम जवळ कारंजा टोलनाक्यावर भीषण अपघात झाला. यात एक ठार तर तिघे जखमी झाले.

    • Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना समृद्धी महामार्गावर वाशिम जवळ कारंजा टोलनाक्यावर भीषण अपघात झाला. यात एक ठार तर तिघे जखमी झाले.

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातसत्र सुरूच आहे. हा मार्ग वाहूतकीसाठी खुला झाला तेव्हा पासून येथील अपघात हे नेहमी चर्चेचे विषय ठरले आहे. या मार्गावर ऐन दिवाळीच्या तोंडावर शनिवारी पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून गावी जात असणाऱ्या काही जणांवर या मार्गावर काळाने घाला घातला आहे. शनिवारी मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Mega block: मध्य, हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक; येथे पाहा रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक!

कौस्तुभ मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व वर्धा येथील रहिवासी आहेत.

Uddhav Thackeray: तुम्ही बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो...; मुंब्य्रात उद्धव ठाकरे कडाडले

दिवाळी सण असल्याने पुण्याहून चार तरुण हे समृद्धी मार्गाने वर्धा येथे जायला निघाले होते. ते या मार्गाने जात असतांना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर नादुरुस्त ट्रक उभा होता. हा ट्रक कार चालकाला दिसला नाही. ट्रक जवळ येताच कार चालकाने दुसऱ्या लेनमधून गाडी घेण्यासाठी वळवली असत यावेळी त्यांची गाडी समृद्धी महामार्गावर सुरक्षा कठड्याला कार धडकली.

धडकेनंतर कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातात कौस्तुभ मुळे हा जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर मोठे दुःखद संकट कोसळले असून दिवाळी सणावर विरजण पडले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या