मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या तपासावर वडिलांची नाराजी, पत्नी म्हणाली माझ्याही हत्येचा कट..

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाच्या तपासावर वडिलांची नाराजी, पत्नी म्हणाली माझ्याही हत्येचा कट..

Mar 19, 2024, 05:33 PM IST

  • Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर जवळपास दीड महिन्यांनी त्यांचे वडील विनोद घोसाळकर व पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांसमोर येत संथ तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अभिषेक घोसाळकर

Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर जवळपास दीड महिन्यांनी त्यांचे वडील विनोद घोसाळकर व पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांसमोर येत संथ तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

  • Abhishek Ghosalkar Murder Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर जवळपास दीड महिन्यांनी त्यांचे वडील विनोद घोसाळकर व पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांसमोर येत संथ तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. फेसबूक लाईव्ह सुरू असतानाच ही हत्या झाल्याने या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. या घटनेनंतर दीड महिन्यांनी अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर व पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी समोर येऊन तपासावर नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत सवाल केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

विनोद घोसाळकर यांनी म्हटले आहे की, या घटनेनंतर पार्थिवाची अग्नि शांत होण्याअगोदर देवेंद्र फडणवीस, उदर सामंत व छगन भुजबळ यांनी बेजबाबदार विधाने करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात ली. त्यावर गाडीखाली श्वान आला तरी विरोधक राजीनामा मागतील, अशी खोचक प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. तर हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद असल्याचे सामंत म्हणाले होते. आपापसातील भांडणात कोणी गोळीबार करत असेल तर पोलीस आणि मंत्री काय करणार असा वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं.

 त्याचबरोबर अभिषेक यांच्या हत्येबाबत आम्हाला संशय आहे. मॉरिसने स्वतःवर गोळी मारताना लाईट कशी बंद केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहेत. या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का? याचा  तपास करा अशी आमची मागणी असल्याचे विनोद घोसाळकर यांनी म्हटले. 

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, मॉरिसने ज्या कार्यक्रमासाठी बोलावले होते त्या कार्यक्रमाला मला घेऊन या असे सांगण्यात आले होते. मात्र मला उशीर झाल्याने अभिषेकने मला दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याचा फोन केला, याचा अर्थ त्यांचा मलाही मारण्याचा कट होता. मात्र माझ्या दोन मुलांचे नशीब चांगले म्हणून मला तेथे जाता आले नाही.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या