मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray : चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया..

Aaditya Thackeray : चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया..

Feb 18, 2023, 03:13 PM IST

  • Aaditya Thackeray reaction after lost shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हिसकावून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आता आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे

AadityaThackerayreaction after lost shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हिसकावून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आता आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • Aaditya Thackeray reaction after lost shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण हिसकावून घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आता आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गटामध्ये धनुष्यबाण व शिवसेना पक्ष कोणाचा, यावरून संघर्ष सुरू होता. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटालादिले आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी आपली भूमिका शिवसैनिकांनसमोर मांडली.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना धीर देत होते. त्यावेळी त्यांच्या बाजुला बसलेले आमदार आदित्य ठाकरे भावूक झालेले दिसत होते. त्यांची अवस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांचे डोळेही पाण्याने डबडबलेले दिसत होते.

शिवसेना युवासेना प्रमुखआमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या फोटोवर शिवसैनिकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येतआहेत. शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पाठिंबाव्यक्त करत असल्याच्या कमेंट करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतआपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी शिंदे गट,देवेंद्र फडणवीस, मोदी तसेचभाजपवर सडकूनटीका केली. तसेच,आम्ही लढत राहू आम्ही खचलेलो नाही आणि खचणार ही नाही असं सांगून आपल्या शिवसैनिकांना धीर दिला. त्यावेळी तेव्हा त्यांच्या बाजूला त्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे हे बसलेले होते. मात्र ते शांत होते अस्वस्थ होते.

पुढील बातम्या