मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर अपघातांचं सत्र सुरूच; ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात १० जण जागीच ठार

Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर अपघातांचं सत्र सुरूच; ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात १० जण जागीच ठार

Oct 15, 2023, 04:58 PM IST

  • Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भाविकांच्या ट्रॅव्हलर गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० ते १२ प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

Samriddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भाविकांच्या ट्रॅव्हलर गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० ते १२ प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

  • Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भाविकांच्या ट्रॅव्हलर गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० ते १२ प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

samruddhi Highway Accident : विकासाचा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल १० ते १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात लहान बालके आणि महिलांचा देखील समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन परत येत असतांना छत्रपती संभाजी नगरमध्ये वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Dussehra 2023: एकविरा देवीच्या दर्शनासाठी जाताय ? तर ही बातमी वाचा; नवरात्रीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक बदल

नाशिक येथील काही भाविक हे सैलानी बाबा दर्ग्याच्या दर्शनाठी गेले होते. हे भाविक एका ट्रॅव्हलर गाडीने गेले होते. गाडीमध्ये तब्बल ३० भाविक होते. हे सर्व जण समृद्धी महामार्गाने परत येत असतांना रात्री दीड च्या सुमारास त्यांची ट्रॅव्हलर बस ही समोरून जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा चक्काचूर झाला. यात १० ते १२ प्रवाशी जागीच ठार झाले तर इतर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नवे समजू शकली नाही. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

Maratha Reservation : भाजपनं जाती-जातींमध्ये लावलेली आग आता पेटायला लागलीय; मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. हे सर्व भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाचे दर्शन घेऊन पुन्हा शनिवारी माघारी जात होते. त्यांची ट्रॅव्हल्स बस छत्रपती संभाजी नगरमध्ये वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ आली असता हा भीषण अपघात झाला. बस मध्ये ३० प्रवासी होते. मात्र, घरी पोहचण्याच्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जखमी आणि मृतांची नावे समजु शकली नाही.

अपघाताची माहिती समजताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस देखील घटनास्थळी आले आहेत. त्यांनी बचाव कार्य सुरू केले आहे. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस यांनी देखील बचाव कार्य सुरू केले आहे.

 

अपघातातील मृतांची नावे :

तनुश्री लखन सोळसे (वय ५ ,रा. समता नगर नाशिक)

संगीता विलास अस्वले (वय ४०, रा. वणासगाव, निफाड)

कांताबाई रमेश जगताप (वय ३८,रा. राजू नगर नाशिक)

रतन जमधडे (वय ४५, रा. संत कबीर नगर नाशिक)

काजल लखन सोळसे (वय ३२,रा. समता नगर नाशिक)

रजनी गौतम तपासे (वय ३२, रा. गवळणी, नाशिक)

हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०, रा. उगाव ता. निफाड जि. नाशिक)

झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०, रा. राजू नगर नाशिक)

अशोक झुंबर गांगुर्डे (वय १८रा. राजू नगर नाशिक)

संगीता झुंबर गांगुर्डे (वय ४०,रा. राजू नगर नाशिक)

मिलिंद पगारे (वय ५०, रा. कोकणगाव ओझर ता. निफाड जि. नाशिक)

दिलीप प्रभाकर केळाणे (वय ४७, रा. बसवंत पिंपळगाव नाशिक)

जखमींची नावे :

पूजा संदीप अस्वले, वय ३५ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

वैष्णवी संदीप अस्वले, वय १२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

ज्योती दिपक केकाणे, वय ३५ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक

कमलेश दगु म्हस्के, वय ३२ वर्ष, रा. राहुलनगर, नाशिक.

संदीप रघुनाथ अस्वले, वय ३८ वर्ष, रा. तिरुपतीनगर, जेलरोड, नाशिक.

युवराज विलास साबळे, वय १८ वर्ष, रा. इंदिरानगर, नाशिक.

कमलबाई छबु म्हस्के, वय ७७ वर्ष, रा. ममदापूर, नाशिक.

संगीता दगडु म्हस्के, वय ६० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

दगु सुखदेव म्हस्के, वय ५० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

लखन शंकर सोळसे, वय २८ वर्ष, रा. समतानगर, नाशिक.

गिरजेश्वरी संदीप अस्वले, वय १० वर्ष, रा. नाशिक.

शांताबाई नामदेव म्हस्के, वय ४० वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

अनील लहानु साबळे, वय ३२ वर्ष, रा. गांधीनगर, नाशिक.

तन्मय लक्ष्मण कांबळे, वय ८ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.

सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, वय २५ वर्ष, रा. वैजापुर

श्रीहरी दिपक केकाणे, वय १२ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.

सम्राट दिपक केकाणे, वय ६ वर्ष, रा. पिंपळगाव,ता.निफाड, जि. नाशिक.

पुढील बातम्या