मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Khadki : पुण्यात ४१ वर्षीय प्रियकराचा २९ वर्षीय प्रेयसीच्या घराबाहेर राडा; कारण ऐकून थक्क व्हाल!

Khadki : पुण्यात ४१ वर्षीय प्रियकराचा २९ वर्षीय प्रेयसीच्या घराबाहेर राडा; कारण ऐकून थक्क व्हाल!

Jan 31, 2023, 02:46 PM IST

  • Pune Crime news : पुण्यात एका प्रेम वेड्याने प्रेयसी बोलत नसल्याच्या रागातून तिच्या घरासोमर धिंगाणा घटल्याचा प्रकार खडकी येथे घडला आहे.

Pune crime (HT_PRINT)

Pune Crime news : पुण्यात एका प्रेम वेड्याने प्रेयसी बोलत नसल्याच्या रागातून तिच्या घरासोमर धिंगाणा घटल्याचा प्रकार खडकी येथे घडला आहे.

  • Pune Crime news : पुण्यात एका प्रेम वेड्याने प्रेयसी बोलत नसल्याच्या रागातून तिच्या घरासोमर धिंगाणा घटल्याचा प्रकार खडकी येथे घडला आहे.

पुणे : पुण्यात एका प्रेमवेड्याने प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तिच्या घरासोमर जात धिंगाणा घातला. ही घटना खडकी येथे घडली आहे. प्रियकराने तिला फोन करून सोसायटीच्या आवारात येण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी येत त्याच्यावर कारवाई केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार प्रियकर हा ४१ वर्षांचा आहे. तर प्रेयसी ही २९ वर्षांची आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्रेयसी ही प्रियकरासोबत बोलत नव्हती. तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडल्याने प्रियकरला राग आला. त्याने तिच्याशी फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बोलण्यास नकार दिला. तरुणाच्या रागाचा पारा वाढल्याने त्याने थेट तिचे घर गाठले. तिला वारंवार फोन करून खाली येण्यास सांगितले. मात्र, तिने खाली येण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या सोसायटीच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तो मोठंमोठ्याने शिवीगाळ करू लागला.

येथील स्थानिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजून घेण्याच्या मानस्थितीत नव्हता. अखेर प्रेयसीने कंटाळून थेट खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खडकी पोलिसांनी तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची नोटीस बजावून समज देऊन त्याला सोडून दिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या