मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gang Rape Case : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; संतापजनक घटनेमुळं पनवेलमध्ये खळबळ

Gang Rape Case : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; संतापजनक घटनेमुळं पनवेलमध्ये खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 31, 2023 12:40 AM IST

Panvel Mumbai Rape Case : तरुणीला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानं पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे.

Panvel Mumbai Rape Case
Panvel Mumbai Rape Case (HT_PRINT)

Panvel Mumbai Rape Case : एका उच्चशिक्षित तरुणीवर पुण्यात सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता पनवेलमध्येही २० वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पनवेलच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हॉटेलमधील काम संपवून घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आल्यामुळं पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली येथील एका हॉटेलमध्ये काम करणारी तरुणी २९ जानेवारीला पहाटेच्या सुमारास घरी जाण्यास निघाली होती. त्यावेळी पनवेलमधून करंजाळे येथे जाण्यासाठी निघालेल्या तरुणीला दोन जणांनी रिक्षा हवी आहे का?, असं विचारलं. तरुणीनं होकार दिल्यानंतर आरोपींनी तिला एका रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेत आळीपाळीनं बलात्कार केला. याशिवाय याबाबतची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणीनं तातडीनं पोलीस ठाणे गाठत घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक करत काही तासांतच दोनपैकी एका आरोपीला अटक केली आहे.

पनवेलमधील या बलात्कार प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पनवेल रेल्वे स्टेशन आणि घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक केले जात आहे. याशिवाय पीडित तरुणीला ज्या रिक्षातून नेण्यात आलं होतं, त्या रिक्षाचाही शोध घेतला जात आहे. बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point