मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला भीषण अपघात, २६ प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती चिंताजनक

ST Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला भीषण अपघात, २६ प्रवासी जखमी, चालकाची प्रकृती चिंताजनक

Jun 03, 2023, 05:07 PM IST

    • Dharashiv ST Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी बस पलटी झाल्याची थरारक घटना समोर आली आहे.
ST Bus Accident In Dharashiv (HT)

Dharashiv ST Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी बस पलटी झाल्याची थरारक घटना समोर आली आहे.

    • Dharashiv ST Bus Accident : चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी बस पलटी झाल्याची थरारक घटना समोर आली आहे.

ST Bus Accident In Dharashiv : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वेंच्या अपघातामुळं देशात शोक व्यक्त केला जात आहे. रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता धाराशीव जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी झाली असून त्यात २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. याशिवाय चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी परंडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, परंडा डेपोतून धाराशीवसाठी निघालेली एसटी बस सोनगिरी जवळ आली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळं भरधाव बस अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यामुळं बसमधील २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. तसेच चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समजताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेंचा भीषण अपघात झाला आहे. त्यात आतापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तब्बल १५०० लोक जखमी झाले आहे. त्यामुळं रेल्वे अपघाताची बातमी ताजी असतानाच एसटी बसच्या अपघाताची बातमी समजताच धाराशीवमध्ये एकच खळबळ उडालीय. त्यामुळं भूम, परांडा, धाराशीवसह बार्शी येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्यात सहभाग घेतला. अपघातग्रस्त एसटी बस क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली आहे. त्यानंतर अनेकांनी थेट रुग्णालयात धाव घेत प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

पुढील बातम्या