मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cold Cough Remedies: झटपट तुमची सर्दी निघून जाईल, फक्त खा या ३ गोष्टी!

Cold Cough Remedies: झटपट तुमची सर्दी निघून जाईल, फक्त खा या ३ गोष्टी!

Feb 12, 2024, 10:58 PM IST

    • Home Remedies:  काही घरगुती टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची सर्दी काही दिवसात बरी करू शकता. याबद्दल जाणून घेऊयात.
health care (freepik)

Home Remedies: काही घरगुती टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची सर्दी काही दिवसात बरी करू शकता. याबद्दल जाणून घेऊयात.

    • Home Remedies:  काही घरगुती टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची सर्दी काही दिवसात बरी करू शकता. याबद्दल जाणून घेऊयात.

Winter Care Tips: सध्या हवामानात बदल होत आहेत. हवामान बदलले की शरीराला सर्दी खोकल्याचा धोका निर्माण होतो. लहान मुले आणि वृद्ध लोकांना सर्दीचा सर्वात आधी त्रास होतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशा परिस्थितीत नाक, घसा आणि छातीत कफ झाल्यामुळे आठवडाभर त्रास होतो. अनेक लोक ते बरे करण्यासाठी औषधे घेतात. पण आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची सर्दी काही दिवसात बरी करू शकता. कसं ते जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

हे घरगुती उपाय करा फॉलो

> पहिला मार्ग आणि सोप्पा मार्ग म्हणजे वाफ घेणे. नाक आणि छातीत रक्तसंचय होत असेल तर वाफ घ्या. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. वाफ घेतल्याने श्वसनमार्गात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात.

> तुळशीचा काढाही उत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने सर्दीपासून आराम मिळतो. जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात याने केली तर तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळेल.

> हळदीचे दूधही उत्तम काम करेल. त्यात आले आणि हळद घालून तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे थंडीपासून लगेच आराम मिळतो. तुम्ही काळी मिरी चहा देखील घेऊ शकता.

> तुम्ही आले आणि मध घालून चहा देखील पिऊ शकता. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात, जे एका दिवसात सर्दी आणि खोकला बरे करण्यास मदत करतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचेही सेवन करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या