मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Teacher's Day: कशी झाली जागतिक शिक्षक दिनाची सुरुवात? जाणून घ्या रंजक इतिहास!

World Teacher's Day: कशी झाली जागतिक शिक्षक दिनाची सुरुवात? जाणून घ्या रंजक इतिहास!

Oct 04, 2023, 04:04 PM IST

    • World Teachers' Day 2023 History दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जगातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.
International Teachers Day 2023 (Pixabay)

World Teachers' Day 2023 History दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जगातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

    • World Teachers' Day 2023 History दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन जगातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

International Teachers Day 2023 Celebration: आपल्या भारतात ५ सप्टेंबरला शिक्षण दिन साजरा होतो पण जगातील अनेक देशांमध्ये ५ ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे शिक्षकांचे जीवनातील महत्त्व आणि गरज लक्षात आणून देणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानणे हा आहे. या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. या दिवशी शिक्षकांचा सत्कार आणि आभार व्यक्त केले जातात. याशिवाय शिक्षकांना येणाऱ्या समस्यांवरही चर्चा केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

काय आहे इतिहास?

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये १९६६ मध्ये झाली. हा तो काळ होता जेव्हा शिक्षकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तसेच शिक्षकांसाठी काही विशेष अधिकार निर्माण करण्यासाठी युनेस्को ऑर्गनायझेशन ऑफ नॅशनल असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. ज्या अंतर्गत ५ ऑक्टोबर १९६६ रोजी फ्रान्समध्ये एक करार झाला होता. त्याचे नाव होते 'Teaching to Freedom'. त्यानंतर शिक्षकांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा दिसून आली. तेव्हापासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला.

काय आहे यंदाची थीम?

जागतिक शिक्षक दिनानिमित्त युनेस्को नेहमीच एक थीम ठेवतात. यंदाही ठेवली आहे. जागतिक शिक्षक दिनानिमित्त, सर्व देशांमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची स्थिती आणखी कशी सुधारता येईल यावर चर्चा आणि कार्य केले जाते. या वर्षाची म्हणजे २०२३ ची थीम आहे “शिक्षणातील परिवर्तनाची सुरुवात शिक्षकांपासून”.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

विभाग

पुढील बातम्या