मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Health: महिलांनी हाडांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज का आहे? जाणून घ्या!

Women Health: महिलांनी हाडांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज का आहे? जाणून घ्या!

Mar 22, 2024, 04:05 PM IST

    • Women Bone Health: आज, भारतातील सुमारे ६.१ कोटी लोकांना ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे आणि त्यातील ८०% महिला आहेत.
Why do women need to prioritize bone health (freepik)

Women Bone Health: आज, भारतातील सुमारे ६.१ कोटी लोकांना ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे आणि त्यातील ८०% महिला आहेत.

    • Women Bone Health: आज, भारतातील सुमारे ६.१ कोटी लोकांना ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे आणि त्यातील ८०% महिला आहेत.

Bone Health Tips: लहान मुलांची हाडे बळकट करण्याकडे आपण भरपूर लक्ष देतो. मात्र प्रौढवयात आपल्या हाडांचे आरोग्य जपण्याच्या महत्त्वाविषयी पुरेशी चर्चा होताना दिसत नाही. लहानपणी आणि युवाप्रौढ वयोगटात असताना आपली हाडे वाढतात आणि विकसित होतात, आणि सर्वसाधारणपणे वयाच्या २५ आणि ३० वर्षांमध्ये आपण आपल्या हाडांचे वस्तुमान (बोन मास) आपली सर्वोच्च पातळी गाठते. पुढे जसजसे वय वाढत जाते तसतशी, साधारणपणे चाळिशीच्या आसपास हळूहळू आपल्या हाडांची घटना कमी होत जाते. या काळामध्ये काही लोकांना इतर संबंधित समस्या जाणवू लागतात, जसे की - घरच्याघरी, बाथरूममध्ये पाय घसरल्यामुळे, पायऱ्यांवरून घसरल्याने अगदी जेमतेम पडले तरीही इतकेच काय, तर एखादी वस्तू उचलल्याने वा जोरात खोकल्याने फ्रॅक्चर होते. नवी हाडे बनण्याच्या प्रक्रियेपेक्षा जेव्हा हाडे विघटित होण्याच्या प्रक्रियेचा वेग अधिक होतो तेव्हा हे घडते आणि आपली हाडे त्यांच्या वस्तुमानात व घनतेमध्ये घट होऊ लागल्याने कमकुवत होतात. ऑस्टिओपोरोसिसचा सामना करणाऱ्या लोकांमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात दिसून येतात. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डॉ. कार्तिक पीतांबरन, मेडिकल अफेअर्स, अबॉट इंडिया यांच्याकडून

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

हे आकडे तुम्हाला माहित आहेत का?

आज, भारतातील सुमारे ६.१ कोटी लोकांना ऑस्टिओपोरोसिसची समस्या आहे आणि त्यातील ८०% महिला आहेत. या स्थितीमध्ये व्यक्तिची हाडे नाजूक बनतात. ऑस्टिओपोरोसिस ही बरेचदा एक ‘मूक स्थिती’ असते आणि फ्रॅक्चर होईपर्यंत तिचे कोणतेही दृश्य परिणाम दिसत नाहीत. बरेचदा, व्यक्तीची उंची कमी होऊ शकते व त्याला पाठदुखी किंवा पाठीला बाक येणे अशा समस्यांची जोड मिळू शकते. ऑस्टिओपोरोसिसशी संबंधित दुखापती या गंभीर स्वरूपाच्या असू शकतात, या दुखापती वेदनादायी असू शकतात आणि त्यातून दीर्घकालीन अपंगत्व उद्भवू शकते. यामुळे व्यक्तीच्या हालचालींवर आणि जीवनमानाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो आणि प्रसंगी इतरांकडून देखभालीची गरज भासू शकते – खरेतर, ऑस्टिओपोरोसिसमुळे हिप फ्रॅक्चर झालेल्यांपैकी ७५% व्यक्तींना दीर्घकालीन देखभाल किंवा पुनर्वसनाची गरज भासते. आणि हाड फ्रॅक्चर होण्याची घटना एकदा घडली की तसेच पुन्हा होण्याचा धोका दुपटीने वाढतो.

ऑस्टिओपोरोसिस विकसित होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारणांमध्ये वय (६५ च्या पुढे), लिंग (स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत जवळ-जवळ चारपट अधिक असते.) कुटुंबाचा पूर्वेतिहास (ऑस्टिओपोरोसिसग्रस्त पालक) आणि व्यक्तिगत वैद्यकीय पूर्वेतिहास (थोडं पडल्यानेही फ्रॅक्चर झाले असल्यास किंवा -हुमाटॉइट आर्थ्रयटिस, पोषणाशी निगडित समस्या आणि कर्करोग इत्यादी) यांचा समावेश होतो.

कोणत्या वयात जास्त त्रास होतो?

सर्वसाधारणपणे वय होऊ लागले की, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर महिलांना या समस्या जाणवू लागतात. इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या मते पन्नास वर्षांहून अधिक वय असलेल्या दर तीन महिलांपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिची समस्या जाणवते. रजोनिवृत्तीकडे जाणारे वय आणि रजोनिवृत्तीचा काळ ऑस्टिओपोरोसिस बळावण्यास निमित्त ठरू शकते, कारण याच काळात स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी घटू लागते. हे हार्मोन हाडांना संरक्षक ढाल पुरवित असते आणि त्याची पातळी कमी होऊ लागल्याने हाडांचा वेगाने क्षय होऊ लागतो, परिणामी लोकांची हाडे बारीक आणि कमकुवत होऊ लागतात. रजोनिवृत्तीपूर्व वयामध्ये असलेल्या महिलांमध्येही इस्ट्रोजनच्या पातळीमध्ये घट होण्यास कारणीभूत ठरणारी हार्मोन डिसऑर्डरची समस्या असल्यास ऑस्टिओपोरोसिस विकसित होऊ शकतो. याशिवाय वायू प्रदूषण ही भारतामध्ये सर्वत्र आढळून येणारी समस्याही रजोनिवृत्ती झालेल्या महिलांच्या हाडे कमकुवत होण्याच्या प्रक्रियेची गती वाढविते.

जीवनशैलीत काय बदल करावेत?

सुदैवाने आपल्या हाडांच्या आरोग्याला बळकटी देण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही अगदी साधेसोपे बदल करता येणे शक्य आहे. यापैकी काही उपाय म्हणजे वजन उचलण्याचे (वेट-बेअरिंग) आणि स्नायू बळकट करण्यासाठीचे व्यायाम (३० ते ४० मिनिटे, आठवड्यातून तीन ते चार वेळा) आणि कॅल्शियम, ड जीवनसत्त्व व प्रथिनांचे इष्ट प्रमाण असलेला पोषक आहार घेणे, धूम्रपान टाळणे आणि अतिरेकी मद्यपान टाळणे तसेच शरीराचे वजन निरोगी पातळीवर राखणे. घराचे ‘फॉल-प्रूफिंग’ (जसे की आधार देणाऱ्या काही गोष्टी घरात बसविणे आणि वावरण्याच्या जागेतील अडथळे काढून टाकणे) केल्यानेही दुखापती टाळण्यास मदत होईल. तसेच, ज्या व्यक्तींना या आजाराचा धोका खूप जास्त संभवतो अशा व्यक्तींनी केवळ जीवनशैलीतील बदलांपलीकडे जाऊन काही कृती करणे महत्त्वाचे ठरते. यात डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि प्रिस्क्राइब केलेल्या उपचारांचे काटेकोर पालन करणे या गोष्टींचा समावेश होतो.

ऑस्टोओपोरोसिसचा प्रतिबंध, निदान आणि उपचार यांविषयी जागरुकता वाढविल्याने लोकांना याविषयी आपल्या आरोग्य पुरवठादारांशी चर्चा करता येईल. यामुळे महिला, विशेषत: रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसारख्या अधिक धोका असलेल्या गटासह एकूणच सर्वांना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक चांगली हाडे घडविण्यास मदत होईल. यामुळे त्यांना आपल्या आवडीची कामे करत राहता येतील आणि एक अधिक निरोगी व परिपूर्ण आयुष्य जगता येईल.

विभाग

पुढील बातम्या