मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Naphthalene Balls: कपड्यांमध्ये नॅफ्थलीनच्या गोळ्या का ठेवल्या जातात? जाणून घ्या योग्य पद्धत!

Naphthalene Balls: कपड्यांमध्ये नॅफ्थलीनच्या गोळ्या का ठेवल्या जातात? जाणून घ्या योग्य पद्धत!

Feb 26, 2024, 12:13 PM IST

    • Fashion Tips: अनेकांनी हिवाळ्यातील गर्मीचे कपडे धुणे आणि पॅक करून ठेवायला सुरुवात केली आहे. अशावेळी अनेक जण नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरतात. जाणून घ्या याचे कारण आणि योग्य पद्धत.
Why are naphthalene balls kept in clothes Learn the correct method (freepik)

Fashion Tips: अनेकांनी हिवाळ्यातील गर्मीचे कपडे धुणे आणि पॅक करून ठेवायला सुरुवात केली आहे. अशावेळी अनेक जण नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरतात. जाणून घ्या याचे कारण आणि योग्य पद्धत.

    • Fashion Tips: अनेकांनी हिवाळ्यातील गर्मीचे कपडे धुणे आणि पॅक करून ठेवायला सुरुवात केली आहे. अशावेळी अनेक जण नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरतात. जाणून घ्या याचे कारण आणि योग्य पद्धत.

Naphthalene Balls for Clothes: हळू हळू हिवाळ्याच्या महिना संपत आला आहे. सूर्यप्रकाश वाढत आहे. उन्हाळा येत असल्याने लोकरीच्या कपड्यांची गरज आता वाटत नाहीये.अनेकजण लोकरीचे कपडे धुवून, ड्राय क्लीन करून त्यांला योग्यरीत्या पॅक करून ठेवत आहेत. अनेकदा लोकरीचे कपडे पॅक करताना नॅफ्थलीनच्या गोळ्या वापरल्या जातात. पण तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल की या गोळ्या का ठेवल्या जातात. या गोळ्या कपड्यांमध्ये ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

कपड्यांसोबत नॅफ्थलीन गोळ्या ठेवल्यास काय होते?

नॅफ्थलीन गोळ्या कपड्यात किंवा कपाटात फार आधी पासून ठेवल्या जातात. नॅफ्थलीनमध्ये काही रसायने असतात ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. खरं तर या गोळ्या हवेच्या संपर्कात आल्यावर हळू हळू मेल्ट होऊ लागतात. कपड्यांमधील ओलाव्यामुळे होणारा वास या गोळ्या टाळण्यास मदत करतात. याशिवाय कपड्यांना कपाटात ठेवल्यानंतर लागणारे पांढरे बुरशी किंवा गंज अशा सर्व प्रकारच्या नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी या गोळ्या ठेवल्या जातात.

हे ही जाणून घ्या

रेशीम आणि सुती कपड्यांसारखे नैसर्गिक फायबरचे कपडे खराब होण्यास या गोळ्या उपयुक्त ठरतात. नॅप्थलीन तीव्र गंध उत्सर्जित करून किड्यांना दूर ठेवतो आणि त्यांना कपडे आणि कापडांवर अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करतात.

नॅफ्थलीन कशासाठी वापरले जाते?

लोकरीचे कपडे, स्नानगृहे, शौचालये, बाथरूम अशा ठिकांतील दुर्गंधी दूर करण्यासाठी नॅप्थालीन गोळ्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात.

कपड्यांमध्ये नॅफ्थलीन ठेवण्याची पद्धत

बहुतेक लोक त्यांच्या कपड्यांमध्ये नॅप्थलीन योग्य पद्धतीने ठेवत नाहीत. ही पद्धत चुकीची आहे. लहान कपड्यांमध्ये नॅफ्थलीनच्या गोळ्या बांधून त्याची पोटली तयार करा. या पोटल्या तुम्ही कपड्यांमध्ये ठेवाव्यात. याचप्रमाणे, नॅफ्थलीनच्या गोळ्यांच्या पोटल्या वॉर्डरोब किंवा कपाटामध्ये देखील ठेवाव्यात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या