मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Benefits of Drinking Hot Milk: गरम दूध पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

Benefits of Drinking Hot Milk: गरम दूध पिण्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या

Apr 03, 2023, 11:50 PM IST

    • Health Care: नेहमीच आपल्या घरातील मोठी लोक सांगतात की दूध रोज पिणे गरजेचे आहे. पण नक्की याचे काय फायदे होतात ते जाणून घ्या.
गरम दूध पिण्याचे फायदे (Freepik)

Health Care: नेहमीच आपल्या घरातील मोठी लोक सांगतात की दूध रोज पिणे गरजेचे आहे. पण नक्की याचे काय फायदे होतात ते जाणून घ्या.

    • Health Care: नेहमीच आपल्या घरातील मोठी लोक सांगतात की दूध रोज पिणे गरजेचे आहे. पण नक्की याचे काय फायदे होतात ते जाणून घ्या.

Warm Milk: आयुर्वेदानुसार दूध हा संपूर्ण आहार मानला जातो. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल तर यासाठी तुम्हाला दररोज दुध पिण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की जर काही कारणास्तव तुम्हाला दिवसभरात कोणत्याही वेळेचं जेवण जेवता येत नसेल तर, तुम्ही एक ग्लास दुधाचे सेवन करून त्याची भरपाई करू शकता. दुधाद्वारे आपल्या शरीराला कॅल्शियम, प्रथिने, नैसर्गिक चरबी, कॅलरीज, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-२ आणि पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. दूध थंड करण्याऐवजी गरम प्यायल्यास त्याचे पौष्टिक मूल्य लक्षणीय वाढते असं आहारतज्ञ सांगतात.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

हाडे मजबूत होतील

दुधामध्ये कॅल्शियम आढळते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. गरम दूध प्यायल्याने हाडांची घनता वाढते आणि तुमचे शरीर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बनते.

मधुमेहामध्ये फायदेशीर

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे असे करणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते.

एनर्जी बूस्टर आहे दुभ

दुधात भरपूर प्रथिने असतात. म्हणूनच दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज रात्री एक ग्लास गरम दूध प्यायल्याने दुसऱ्या दिवशी एनर्जी राहते. त्याचबरोबर दूध प्यायल्याने स्नायूंचा विकास होण्यासही मदत होते.

थकवा दूर करते

आजच्या काळात लोक कामात इतके व्यस्त झाले आहेत की ते स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत थकवा आणि चिडचिड होणे अपरिहार्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही गरम दुधाला तुमच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनवा. यामुळे तुमची समस्या दूर होईल.

झोपेची कमतरता राहणार नाही

रात्री, प्रत्येक व्यक्तीने एक ग्लास कोमट दूध प्यावे, ते शरीर आणि मनाला प्रचंड आराम देते. असे केल्याने झोपेची गुणवत्ता चांगली राहते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा जाणवत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या