मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Soup: हे सूप हिवाळ्यात वाढवेल प्रतिकारशक्ती! जाणून घ्या सोपी रेसिपी

Soup: हे सूप हिवाळ्यात वाढवेल प्रतिकारशक्ती! जाणून घ्या सोपी रेसिपी

Feb 01, 2024, 09:32 AM IST

    • Breakfast Recipe: थंडीच्या मोसमात घसा खवखवणे आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सूप उपयोगी ठरते. हे सूप पिऊन तुम्ही या ऋतूमध्ये तुमची कमी प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता.
how to make soup (freepik)

Breakfast Recipe: थंडीच्या मोसमात घसा खवखवणे आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सूप उपयोगी ठरते. हे सूप पिऊन तुम्ही या ऋतूमध्ये तुमची कमी प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता.

    • Breakfast Recipe: थंडीच्या मोसमात घसा खवखवणे आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सूप उपयोगी ठरते. हे सूप पिऊन तुम्ही या ऋतूमध्ये तुमची कमी प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता.

Healthy Soup Recipe: थंडीचा सीजन सुरु आहे. यामध्ये अनेक आजार होतात. या सिजनमध्ये अनेक समस्या होतात. थंडीच्या सिजनमध्ये घसा खवखवणे आणि थकवा येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा सूपबद्दल सांगणार आहोत, जे पिऊन तुम्ही या ऋतूमध्ये तुमची कमी प्रतिकारशक्ती देखील मजबूत करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही जास्त विशेष गोष्टींची गरज नाही. या रेसिपीला लागणाऱ्या सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळतील. चला जाणून घेऊयात हेल्दी सूप कसं बनवायचं ते..

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

लागणारे साहित्य

बीटरूट - ३ते ४

गाजर - २ ते ३

लिंबू रस - २ टीस्पून

आले - ४ लहान तुकडे

तूप - १ टेबलस्पून

पाणी - ५०० मिली

हळद - १ टीस्पून

काळी मिरी - १ टीस्पून

बडीशेप - २ टीस्पून

मीठ - चवीनुसार

जाणून घ्या कृती

> बीटरूट आणि गाजरचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करा.

> कढईत तूप गरम करून त्यात आले व इतर मसाले टाका. यानंतर २ मिनिटे शिजवा.

> आता या मसाल्यांमध्ये गाजर आणि बीटरूट पाण्यासोबत घाला.

> या प्युरीमध्ये मीठ घालून १५ मिनिटे शिजवा.

> यानंतर, १-२ उकळल्यानंतर, ते गाळून घ्या, नंतर सूप पुन्हा पॅनमध्ये घ्या. छान शिजू द्या.

> यानंतर, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या