मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dahi Handi 2023: भारतातील या ठिकाणी खास पद्धतीने साजरी केली दहीहंडी, पाहण्याची असते वेगळी मजा

Dahi Handi 2023: भारतातील या ठिकाणी खास पद्धतीने साजरी केली दहीहंडी, पाहण्याची असते वेगळी मजा

Sep 06, 2023, 08:03 PM IST

    • Dahi Handi Celebration: : भारतातील काही ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी साजरी केली जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.
दहीहंडी सेलिब्रेशनसाठी बेस्ट ठिकाणं (Freepik)

Dahi Handi Celebration: : भारतातील काही ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी साजरी केली जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.

    • Dahi Handi Celebration: : भारतातील काही ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी साजरी केली जाते. येथे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.

Best Places For Dahi Handi Celebration: कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा कृष्ण जन्माष्टमी ६ सप्टेंबर रोजी तर दहीहंडी ७ सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. या सणाला महिला उपवास ठेवतात आणि रात्री १२ वाजता कृष्ण जन्म झाल्यावर भोजन करतात. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी कृष्ण जन्मोत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान दहीहंडी खूप उंचावर बांधली जाते. त्यानंतर वेगवेगळे गोविंदा पथक ती फोडण्याचा प्रयत्न करतात. जो तो यशस्वीपणे फोडतो त्याला आयोजकांकडून बक्षीस मिळते. तुम्हालाही हे खास सेलिब्रेशन बघायचा असेल तर आम्ही भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही या सेलिब्रेशनचा आनंद घेऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

भारतात कोणत्या ठिकाणी खास असते दहीहंडी सेलिब्रेशन?

मुंबई

बॉलिवूड पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईत तुम्हाला जन्माष्टमीचा वेगळा उत्सव पाहायला मिळणार. मुंबईत दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची शहरात बऱ्याच दिवस आधीपासून तयारी सुरू होते. जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यांना सेलिब्रिटीही हजेरी लावतात.

वृंदावन

मथुरेच्या सर्वात जवळ असलेल्या वृंदावनमध्ये तुम्ही जन्माष्टमीचा आनंद घेऊ शकता. वृंदावनमध्ये जन्माष्टमीच्या १० दिवस आधी उत्सव सुरू होतो. इथली जन्माष्टमी पाहण्यासारखी असली तरी या वेळी खूप गर्दी असते. त्यामुळे काही लोक या सणाला येथे जाणे टाळावे असा सल्ला देतात.

 

दिल्ली

दिल्लीत दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातो. दिल्लीच्या अनेक भागात तुम्हाला दहीहंडी उत्सव पाहायला मिळेल. या निमित्ताने हंडीच्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने येतात आणि दही मटकी फोडण्याचा आनंद लुटतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या