मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2022 Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार असाल तर आहारात ‘या' गोष्टींचा समावेश करा!

Navratri 2022 Diet Plan: नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार असाल तर आहारात ‘या' गोष्टींचा समावेश करा!

Sep 24, 2022, 02:18 PM IST

    • Navratri 2022 Fasting Rules: २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात भक्त दुर्गादेवीचा उपवास करतात.
उपवासात घ्या काळजी

Navratri 2022 Fasting Rules: २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात भक्त दुर्गादेवीचा उपवास करतात.

    • Navratri 2022 Fasting Rules: २६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात भक्त दुर्गादेवीचा उपवास करतात.

नवरात्रीमध्ये काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. देवीची पूजा करणारे लोक उपवासाचे वेगवेगळे नियम पाळतात. यावर्षी शारदीय नवरात्रीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. उपवास तेही सलग ९ दिवस म्हणजे शरीरातील ताकद कमी होणारच. अशावेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरही आहाराची काळजी घ्यावी लागेल. येथे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती वाढेल.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

१) नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट, प्रथिने, कोलेस्ट्रॉल, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सिन, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-के असतात. तुम्ही दिवसभरात एक ते दोन नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढेल.

२) भिजवलेले ड्रायफ्रुट्स

उपवास करताना तुम्ही नाश्त्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. ते खाल्ल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्वे मिळतील आणि त्यामुळे अशक्तपणा दूर होईल. सुका मेवा रात्री भिजवून त्यांचा आहारात समावेश करावा.

३) पपई

उपवास करताना अनेकदा पोट साफ न झाल्यामुळे त्रास होतो. अशा स्थितीत उपवासाच्या वेळी पपई खावी. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहील आणि उपवास सोडल्यावर अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही दूर होईल.

४) दूध

दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रिबोफ्लेव्हिनेज असतात. दूध प्यायल्याने तुम्हाला पूर्ण पोषण मिळते आणि ते प्यायल्यानंतर तुम्हाला भूकही लागत नाही.

विभाग

पुढील बातम्या