मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Yoga Mantra: मानसिक शांती-शारीरिक संतुलन वाढवण्यासाठी करा वृक्षासन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे!

Yoga Mantra: मानसिक शांती-शारीरिक संतुलन वाढवण्यासाठी करा वृक्षासन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे!

Jan 02, 2023, 08:38 AM IST

    • Yoga for Mental Health: वृक्षासन हा प्रभावी योगासनांपैकी एक आहे, ज्याचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात.
फिटनेस (Freepik )

Yoga for Mental Health: वृक्षासन हा प्रभावी योगासनांपैकी एक आहे, ज्याचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात.

    • Yoga for Mental Health: वृक्षासन हा प्रभावी योगासनांपैकी एक आहे, ज्याचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात.

Fitness Tips: योगाचा नियमित सराव करणे एकूण मानसिक आणि शारीरिक सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. मेंदू आणि मज्जातंतूंवर विशेष प्रभाव पडतो, शारीरिक निष्क्रियतेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी योगासने करण्याची सवय देखील फायदेशीर ठरते. काही प्रकारच्या योगासनांचा नित्यक्रमात समावेश करून तुम्ही उत्तम फिटनेस मिळवू शकता.वृक्षासन हा अशाच प्रभावी योगासनांपैकी एक आहे, ज्याचा सराव सर्व वयोगटातील लोक करू शकतात. अगदी सहज हा योग तुमच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा करू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

योग तज्ञ म्हणतात, वृक्षासन योग करण्यासाठी तुम्हाला विशेष शारीरिक संतुलन आवश्यक आहे. वृक्षासन हा उभा व्यायाम आहे ज्यामध्ये शरीराची मुद्रा 'झाडा'सारखी असावी. हे योग आसन आपल्याला मनःशांती प्राप्त करण्यास मदत करते.हा योग नियमितपणे करणे विशेषतः चिंता आणि नैराश्यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. हा व्यायाम करण्याची पद्धत आणि त्याचे आरोग्य फायदे याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया.

वृक्षासन कसं करावं?

सर्व वयोगटातील लोकांना वृक्षासन योगाच्या सरावाचा सहज फायदा होऊ शकतो, जरी तुम्हाला त्यात शारीरिक संतुलन निर्माण करण्यासाठी सराव करणे आवश्यक आहे. हा योग करण्यासाठी पाय एकमेकांपासून काही अंतरावर ठेवून सरळ उभे रहा. तुमचा उजवा पाय वाकवा आणि नंतर डाव्या मांडीवर ठेवा. श्वास घेताना हात वर करा, तळवे एकत्र जोडून नमस्कार मुद्रा करा आणि मनाला ध्यानस्थ स्थितीत ठेवा. १० ते ३० सेकंद या आसनात रहा, नंतर श्वास सोडताना हात खाली आणा. पुढील चरणात, डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून या आसनाचा सराव करा.

वृक्षासनाचा काय फायदा होतो?

> शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

> या योग आसनामुळे पायांचे संतुलन आणि स्थिरता सुधारते.

> शरीराला पेल्विक स्थिरता स्थापित करण्यास मदत करते.

> यामुळे नितंब आणि पायांची हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

> आत्मविश्वास वाढवण्यासाठी या योगाचे फायदे आहेत.

> मानसिकदृष्ट्या शांतता अनुभवली जाते, चिंता-तणावांचे विकार यामुळे कमी होऊ शकतात.

वृक्षासन करताना ही काळजी घ्या

वृक्षासन किंवा ट्री पोज योगाचे मेंदू, प्रतिकारशक्ती, पाठीचा कणा आणि शारीरिक स्थैर्याशी संबंधित विविध फायदे आहेत. या आसनाचा नियमित सराव केल्याने तुम्हाला विशेष फायदे मिळतात, परंतु काही परिस्थितींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला मायग्रेन, निद्रानाश, रक्तदाबाची समस्या असेल तर अशा परिस्थितीत वृक्षासन करण्यापूर्वी योग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या