मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मुलं छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडतात? पालकांनी स्वतःमध्ये करा हे बदल

मुलं छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडतात? पालकांनी स्वतःमध्ये करा हे बदल

Jan 21, 2023, 11:06 PM IST

    • Parenting Tips: मुलाचे संगोपन करणे सोपे काम नाही. जेव्हा मूल तुमचे ऐकत नाही किंवा ओरडत असेल तर तुम्हाला राग येतच असेल. पण रागाच्या भरात मुलावर ओरडू नका, तर शांत राहा.
पॅरेंटिंग टिप्स

Parenting Tips: मुलाचे संगोपन करणे सोपे काम नाही. जेव्हा मूल तुमचे ऐकत नाही किंवा ओरडत असेल तर तुम्हाला राग येतच असेल. पण रागाच्या भरात मुलावर ओरडू नका, तर शांत राहा.

    • Parenting Tips: मुलाचे संगोपन करणे सोपे काम नाही. जेव्हा मूल तुमचे ऐकत नाही किंवा ओरडत असेल तर तुम्हाला राग येतच असेल. पण रागाच्या भरात मुलावर ओरडू नका, तर शांत राहा.

Parents Behavior Guide: मुलाचे संगोपन करणे सोपे काम नाही. तुम्ही स्वतःला छान पालक मानता आणि नेहमी शांत राहता. पण जसजशी मुलं मोठी होतात तस तशी त्यांच्या खोडसाळपणामुळे आणि अॅक्टिव्हिटीमुळे राग येतो. परिणामी तुम्ही त्याच्यावर ओरडता. ज्यामुळे मुलाशी असलेल्या संबंधांवर देखील परिणाम होतो. विशेषत: मूल लहान असताना त्याच्याशी अतिशय प्रेमळ आणि शांतपणे वागणेआवश्यक आहे. अन्यथा तो प्रत्येक गोष्टीवर ओरडणे आणि रागवणे शिकेल.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

रागाच्या भरात असे वागू नका

तुम्ही मुलाला शिस्त शिकवण्यासाठी आणि त्याचे वर्तन बदलण्यासाठी शिक्षा देऊ शकता. पण रागाच्या भरात त्याला शिक्षा देऊ नका. असे केल्याने मुलाच्या मनावर चुकीचा परिणाम होतो आणि तो बिघडू शकतो.

विचार करण्याची पद्धत बदला

जेव्हा मूल तुमचे न ऐकता ओरडायला लागते तेव्हा सर्वप्रथम त्याच्या दृष्टीने विचार करा. मनात राग येत असला तरी शांत राहा. दोन ते तीन वर्षांच्या मुलामध्ये तुमचा राग आणि कारण पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुरेशी समज विकसित होत नाही.

पहिले स्वतः शिका

जर तुमचे मूल भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल आणि प्रत्येक मुद्द्यावर रागाने ओरडायला लागले तर त्याला रागवण्याऐवजी किंवा त्याच्यावर ओरडण्याऐवजी त्याला स्वतःला शांत ठेवायला शिकवा. मुले त्यांच्या पालकांना पाहून शिकतात. योग्य वर्तनाचे उदाहरण त्याच्यासमोर ठेवून, तो शिकेल आणि आतापासून त्याच्या रागात फरक पाहू शकेल.

योग्य शिक्षण

अनेक वेळा पालक मुलाला त्याची चूक मान्य करायला सांगतात पण स्वतःची चूक मान्य करत नाही किंवा मुलावर दोष देतात. अशा प्रकारचे वागणे मुलासाठी योग्य नाही. प्रथम तुमची चूक मान्य करण्याबद्दल बोला आणि पुन्हा ती पुन्हा करू नका. आपल्या शब्दांची आणि कृतीची जबाबदारी घ्या. हे पाहून मूल देखील चांगली गोष्ट शिकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या