मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ozone Therapy: वैद्यकीय उपचारात वापरली जातेय ओझोन थेरपी! जाणून घ्या प्रक्रियेबद्दल

Ozone Therapy: वैद्यकीय उपचारात वापरली जातेय ओझोन थेरपी! जाणून घ्या प्रक्रियेबद्दल

Jun 29, 2023, 02:31 PM IST

    • आजार किंवा जखमेवर उपचार करण्यासाठी ओझोन शरीरात प्रवेश करण्‍याच्‍या प्रक्रियेला ओझोन थेरपी म्हणतात. ही थेरपी आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
Health Care (Freepik )

आजार किंवा जखमेवर उपचार करण्यासाठी ओझोन शरीरात प्रवेश करण्‍याच्‍या प्रक्रियेला ओझोन थेरपी म्हणतात. ही थेरपी आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

    • आजार किंवा जखमेवर उपचार करण्यासाठी ओझोन शरीरात प्रवेश करण्‍याच्‍या प्रक्रियेला ओझोन थेरपी म्हणतात. ही थेरपी आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

सूर्याच्‍या अतिनील किरणापासून आपले संरक्षण करणारा वायू म्हणजे ओझोन. प्रामुख्याने वातावरणाच्या वरच्या स्तरावर आढळणारा ओझोन वायूचा मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया, ब्लीचिंग, अन्न संरक्षण, जल प्रक्रिया, शुद्धीकरण, मत्स्यपालन आणि सेंद्रिय रासायनिक संश्लेषण व शुद्धीकरण यासारख्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ओझोन वैद्यकीय उद्योगात देखील सक्रियपणे वापरला जात आहे आणि सुमारे शतकाहून अधिक काळापासून वापरला जात आहे. आजार किंवा जखमेवर उपचार करण्यासाठी ओझोन शरीरात प्रवेश करण्‍याच्‍या प्रक्रियेला ओझोन थेरपी म्हणतात. ही थेरपी आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. पण, ओझोन उपचारांच्या अपूर्ण माहितीमुळे अनेक पूर्वाग्रही विचार निर्माण झाले आहेत. ओझोनबद्दल काही सामान्य गैरसमज आणि मिथक याबद्दल ओझोन फोरम ऑफ इंडियाच्‍या अध्‍यक्ष आणि बिस्‍लेरी चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍या विश्‍वस्‍त डॉ. मिली शाह यांच्याकडून जाणून घेऊयात...

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

मिथक १: ओझोन थेरपी अत्‍यंत घातक आहे

बहुतांश लोक 'ओझोन'ला पृ‍थ्‍वीच्‍या वातावरणातील अनेक प्रदूषकांपैकी एक असल्‍याचे मानतात. ओझोन रेणू हा ऑक्सिजनचा सक्रिय आणि प्रतिक्रियाशील प्रकार आहे. वैद्यकीय ओझोन प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकाच्या मार्गदर्शनाखाली अचूक व नियंत्रित डोसमध्ये प्रशासित केले जाते आणि योग्यरित्या वापरल्यास ते घातक नसते. हे एक पर्यायी सहायक वैद्यकीय उपचार आहे, ज्‍यामध्‍ये शरीरात ओझोन किंवा ओझोनाइड्सचा प्रवेश केले जाते. याचा उपयोग वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी केला जातो, तसेच तो रोगप्रतिकारशक्‍ती वाढवतो, निर्जंतुकीकरण्यासाठी वापरला जातो आणि याने बऱ्याच लोकांना प्रभावीपणे बरे करण्यास मदत केली आहे.

मिथक २: ओझोन थेरपी नवीन ट्रेण्‍ड आहे

सामान्य समजुतीच्या तुलनेत ओझोन थेरपी ही नवीन संकल्पना नाही. ओझोनचा वापर प्रथम १९००च्या दशकाच्या सुरुवातीस ऑपरेटिंग रूम्स निर्जंतुक करण्यासाठी आणि वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी केला गेला. त्‍यानंतर लवकरच जर्मन डॉक्टरांनी त्याचे उपचारात्मक फायदे शोधून काढले आणि गँगरीनपासून कर्करोगापर्यंत विविध आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा उपयोग केला. ओझोन थेरपीचा वापर युरोपमध्ये ५० वर्षांहून अधिक काळ प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे अनेक वैद्यकीय आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. वैद्यकीय ओझोन थेरपी सध्या १६ देशांमध्ये कायदेशीररित्या वापरली जाते. भारतात ओझोन थेरपीच्या सरावासाठी कोणतेही औपचारिक नियम नसले तरी, ओझोन फोरम ऑफ इंडिया जागरूकता निर्माण करण्यासाठी, क्लिनिकल अनुभव शेअर करण्यासाठी, सर्वोत्तम दर्जा व पद्धती सुनिश्चित करण्यासाठी आणि डॉक्टरांमध्ये केसेसची देवाणघेवाण करण्यासाठी समान व्यासपीठ प्रदान करते.

मिथक ३: ओझोन थेरपीला विज्ञानाचा पाठिंबा नाही

हे मिथक खरे असू शकत नाही! ओझोन रेणू अस्थिर आहे आणि ऑक्सिजनचा सक्रिय व प्रतिक्रियाशील प्रकार आहे. हा ऑक्सिजनचा रेणू रक्त, लिम्फ आणि शरीराच्या इतर उतींना त्वरीत एकत्र करून शुद्ध करतो. ओझोन-ऑक्सिजन वायू एखाद्या आजारावर किंवा जखमेवर उपचार करण्यासाठी शरीरात प्रवेश केल्‍या जाण्‍याची प्रक्रियेला ओझोन थेरपी म्हणतात. ५,००० हून अधिक वैज्ञानिक अभ्यास विविध वैद्यकीय आजारांमध्ये ओझोन थेरपीच्या वापरास समर्थन देतात. ओझोन थेरपीवरील इंटरनॅशनल सायण्टिफिक कमिटीने विषाणूजन्‍य संसर्ग, दातांचा संसर्ग आणि क्रोनिक जखमा अशा अनेक आजारांसाठी ओझोन उपचार हा व्‍यवहार्य वैद्यकीय उपचार पर्याय म्‍हणून मान्‍यता दिली आहे.

मिथक ४: ओझोन थेरपी गंभीर आजारी असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी आहे

ओझोन थेरपी वापरण्यासाठी तुम्हाला आजारी असण्याची गरज नाही. ओझोन थेरपी उपचार असण्‍यासोबत प्रतिबंधात्मक उपाय देखील आहे. नियमित व्‍यायाम केल्‍यास तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते आणि तुमची ऊर्जा व फिटनेस पातळी वाढते. ऑक्सिजन हा शरीराला टिकून राहण्‍यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आवश्यक असलेला अत्यावश्यक घटक आहे. ऑक्सिजन शरीराची कार्यप्रणाली डिटॉक्‍स करतो. ऑक्सिजनची योग्य पातळी राखण्यासाठी नियतकालिक ओझोन बाथ किंवा बायो-ऑक्सिडेटिव्ह उपचारांचे इतर प्रकार वापरले जाऊ शकतात. हे शरीरातील अपव्‍यय मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यास मदत करू शकते, ज्यामुळे अन्यथा कर्करोग किंवा इतर डिजनरेटिव्‍ह आजार होऊ शकतात.

मिथक ५: ओझोन थेरपीचा फक्‍त एकच प्रकार आहे

वायूच्या अवस्थेत औषधोपचार असामान्य आहे, त्यामुळे ओझोनच्या सुरक्षित वापरासाठी विशेष तंत्रे तयार केली जातात. श्वासोच्छवासाच्या एपिथेलियमला अतिसंवेदनशील असल्याने ओझोन थेरपीच्या कोणत्याही प्रकारात थेट इनहेल केले जात नाही. हे बाह्य तसेच अंतर्गत उपयोजनांद्वारे अनेक स्वरूपात प्रशासित केले जाते. स्थानिक किंवा सामान्यीकृत त्वचेच्या स्थितीत बाह्य उपयोजनांचा चांगला उपयोग होतो.

मानवजातीला ज्ञात असलेली सर्वात जुनी वैद्यकीय यंत्रणा भारतात आहे. औषधोपचाराची अशी वैविध्‍यपूर्ण पद्धत असलेल्‍या देशात पर्यायी औषधांची मागणी वाढत आहे. भारत सरकारने देखील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि पूरक औषधांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी नियामक परिषदांची स्थापना केली आहे. जग प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार पर्याय वापरण्याला अधिक प्राधान्‍य देत असताना किफायतशीर औषधी पद्धती आणण्याची गरज वाढत आहे. ओझोन थेरपी अनेक गंभीर व क्रोनिक आजारांचा प्रतिबंध व व्‍यवस्‍थापनामध्‍ये साह्य करण्‍यामध्‍ये प्रमाणित ठरली असून वैद्यकीय क्षेत्राची इकोनॉमिकल पूरक शाखा देखील आहे. आरोग्‍याबाबत जागरूक असलेल्‍या आजच्‍या पिढीसाठी ही उत्तम थेरपी आहे आणि शरीराला डिटॉक्सिफाय करू पाहणाऱ्यांसाठी योग्‍य पर्याय आहे. आरोग्‍यदायी जीवनशैलीसाठी शरीर व मन आरोग्‍यदायी असणे आवश्‍यक आहे. 

विभाग

पुढील बातम्या