मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2022 Special : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता राणीला अर्पण करा कलाकंद! नोट करा रेसिपी

Navratri 2022 Special : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता राणीला अर्पण करा कलाकंद! नोट करा रेसिपी

Sep 26, 2022, 09:00 AM IST

    • Navratri First Day Recipe: मातेला प्रसन्न करण्यासाठी तिला रोज दररोज वेगवेगळ्या वस्तू प्रसादात अर्पण केल्या जातात. 
कलाकंद (Freepik)

Navratri First Day Recipe: मातेला प्रसन्न करण्यासाठी तिला रोज दररोज वेगवेगळ्या वस्तू प्रसादात अर्पण केल्या जातात.

    • Navratri First Day Recipe: मातेला प्रसन्न करण्यासाठी तिला रोज दररोज वेगवेगळ्या वस्तू प्रसादात अर्पण केल्या जातात. 

Kalakand Recipe for Maa Shailputri Bhog: नवरात्रीचा सण आजपासून सुरू होत आहे. माता आदिशक्तीची उपासना करणाऱ्यांसाठी नवरात्रीचे नऊ दिवस खूप खास असतात. या वर्षी नवरात्रीचे व्रत आजपासून म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२, सोमवारपासून सुरू होणार आहेत आणि ५ ऑक्टोबर २०२२, बुधवारी समाप्त होणार आहेत. नवरात्रीच्या ९ दिवसात माता दुर्गा , शैलपुत्री, ब्रह्मचारिणी चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि नवव्या दिवशी माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज माता शैलपुत्रीच्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी मातेला गायीचे तूप अर्पण करावे, असे सांगितले जाते. असे केल्याने रोग आणि प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळते. माता शैलपुत्रीला भोग अर्पण करण्यासाठी घरी कलाकंद प्रसाद कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

कलाकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर - दीड कप

कंडेन्स्ड मिल्क - ३/४ कप

हिरवी वेलची पावडर - १/४ टीस्पून

तूप

बारीक चिरलेला पिस्ता - गार्निशिंगसाठी

कलाकंद कसा बनवायचा?

कलाकंद बनवण्यासाठी प्रथम पनीर किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि बाजूला ठेवा. आता एका छोट्या खोलगट ताटाला तूप लावून घ्या. यानंतर एका पातेल्यात कंडेन्स्ड मिल्क आणि किसलेले पनीर टाका. नीट मिक्स करा. हे मिश्रण मंद आचेवर सतत चमच्याने ढवळत राहा. घट्ट होईपर्यंत शिजवा. हे मिश्रण ४-७ मिनिटे शिजवा जोपर्यंत ते पॅनच्या बाजूंना चिकटत नाही.आता त्यात १/४ टीस्पून वेलची पावडर टाकून नीट मिक्स करा आणि गॅस बंद करा. आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढा आणि छान पसरवा. त्यावर बारीक चिरलेला पिस्ता टाका आणि चमच्याने हलके दाबून घ्या. यानंतर, तयार मिश्रण खोलीच्या तापमानाला अर्थात थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर, हे मिश्रण सेट होण्यासाठी सुमारे २ तास फ्रीजमध्ये ठेवा. आता ते थंड झाल्यावर मिश्रण फ्रीजमधून काढून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करा. तुमचा चविष्ट कलाकंद तयार आहे. तुम्ही ते माता राणीला अर्पण करू शकता.

विभाग

पुढील बातम्या