मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Hacks: थोडे थोडे उरलेले मेकअप प्रोडक्ट फेकू नका, त्यातून बनवा बीबी क्रीम

Makeup Hacks: थोडे थोडे उरलेले मेकअप प्रोडक्ट फेकू नका, त्यातून बनवा बीबी क्रीम

Jan 02, 2023, 05:30 PM IST

    • मेकअप करताना अनेक छोट्या छोट्या टिप्समुळे तुमचा वेळ वाचतो. तसेच काही हॅक्स मुळे तुमच्या प्रोडक्टचा योग्य वापर होते. तुमच्या उरलेल्या मेकअप प्रोडक्टपासून तुम्ही घरच्या घरी बीबी क्रीम बनवू शकता. कसे ते जाणून घ्या.
उरलेल्या मेकअप प्रोडक्ट पासून बीबी क्रीम बनवा

मेकअप करताना अनेक छोट्या छोट्या टिप्समुळे तुमचा वेळ वाचतो. तसेच काही हॅक्स मुळे तुमच्या प्रोडक्टचा योग्य वापर होते. तुमच्या उरलेल्या मेकअप प्रोडक्टपासून तुम्ही घरच्या घरी बीबी क्रीम बनवू शकता. कसे ते जाणून घ्या.

    • मेकअप करताना अनेक छोट्या छोट्या टिप्समुळे तुमचा वेळ वाचतो. तसेच काही हॅक्स मुळे तुमच्या प्रोडक्टचा योग्य वापर होते. तुमच्या उरलेल्या मेकअप प्रोडक्टपासून तुम्ही घरच्या घरी बीबी क्रीम बनवू शकता. कसे ते जाणून घ्या.

How to Make BB Cream: अनेक मुलींना मेकअप करण्याची खूप आवड असते, पण गडबडीत त्यांना सहज मेकअप करता येत नाही. अशा परिस्थितीत मेकअपवर जास्त वेळ घालवण्याऐवजी काही बेसिक गोष्टींसह मेकअप करणं खूप गरजेचंआहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मेकअपसाठी प्राइमर, फाउंडेशन किंवा कन्सीलर वापरायचा नसेल तर तुम्ही बीबी क्रीम देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला बीबी क्रीमवर वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही, तर तुम्ही बीबी क्रीम घरी सहज बनवू शकता. चला तर बीबी क्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

Beauty Trend: तांदूळ आणि त्याच्या पाण्यापासून बनवलेले हे फेस पॅक होत आहे व्हायरल, तुम्ही ट्राय केले का?

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

तुमच्या स्किन टोनशी जुळणारी बीबी क्रीम तयार करण्यासाठी तुमच्या मेकअप बॉक्समधून उरलेले प्राइमर, फाउंडेशन, सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट पावडर मिक्स करा. तुम्ही ही बीबी क्रीम पावडर न घालताही बनवू शकता. जर तुमची त्वचा खूप ऑइली असेल तर कोणतीही क्रीम घालण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त, जर तुमची त्वचा ऑइली असेल, तर तुम्ही त्यात काही क्रीम देखील घालू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहू शकते. या गोष्टी मिक्स करा आणि एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा.

कसे वापरावे

हे वापरण्यापूर्वी चेहरा नीट फेसवॉशने स्वच्छ करा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर क्रीम लावा. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर योग्य ठरेल. आता ही बीबी क्रीम चेहऱ्यावर लावा. तिला नीट ब्लेंड करा. तुम्ही यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करु शकता किंवा हाताने देखील नीट लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या