मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  किचनमध्ये झुरळांचा त्रास? फॉलो करा हे हॅक्स

किचनमध्ये झुरळांचा त्रास? फॉलो करा हे हॅक्स

May 27, 2022, 06:30 PM IST

    • Kitchen Hacks : किचन मध्ये मुंग्या, माकोडे, झुरळांचा त्रास महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी असते. अनेक वेळा साफसफाई करून सुद्धा झुरळांचा वावर असतो. तुम्ही देखील झुरळांना त्रासला असाल तर हे सोपे हॅक्स फॉलो करा आणि या समस्येपासून सुटका मिळवा.
झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी किचन हॅक्स

Kitchen Hacks : किचन मध्ये मुंग्या, माकोडे, झुरळांचा त्रास महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी असते. अनेक वेळा साफसफाई करून सुद्धा झुरळांचा वावर असतो. तुम्ही देखील झुरळांना त्रासला असाल तर हे सोपे हॅक्स फॉलो करा आणि या समस्येपासून सुटका मिळवा.

    • Kitchen Hacks : किचन मध्ये मुंग्या, माकोडे, झुरळांचा त्रास महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी असते. अनेक वेळा साफसफाई करून सुद्धा झुरळांचा वावर असतो. तुम्ही देखील झुरळांना त्रासला असाल तर हे सोपे हॅक्स फॉलो करा आणि या समस्येपासून सुटका मिळवा.

Easy Ways to Get Rid of Pesky Kitchen Insects: अनेकदा घरातील महिलांची तक्रार असते की, त्यांनी स्वयंपाकघर कितीही स्वच्छ केले तरी कपाटांच्या मागे लपलेले किडे पळून जाण्याचे नाव घेत नाहीत. तुम्ही देखील अशा महिलांमध्ये असाल, ज्या स्वयंपाकघरात लपलेल्या कीटकांच्या दहशतीमुळे हैराण झालेल्या आहेत तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कापूरः कापूर वापरून तुम्ही कपाट किंवा स्टोअर रूममध्ये लपलेले कीटक सहज दूर करू शकता. यासाठी कापूर बारीक करून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये एक ते दोन चमचे लॅव्हेंडर तेल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्वयंपाकघरातील कपाटात किंवा जिथे तुम्हाला कीटक येऊ शकतात असे वाटते तिथे शिंपडा. याशिवाय तुम्ही या मिश्रणात कापूस भिजवून ते कापूस सुद्धा ठेवू शकता. या मिश्रणाच्या तीव्र वासाने कीटक सहज पळून जातील.

लवंगः किचनमध्ये असलेल्या लवंगा फक्त जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाहीत तर तुमच्या किचनमधून किडे नष्ट करण्यातही मदत करतात. लवंगाच्या तीव्र आणि तिखट वासामुळे झुरळ किंवा लहान कीटक सहज बाहेर पडतात. हा उपाय करण्यासाठी लवंग पावडर वापरा. लवंग पावडर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करा आणि स्प्रे बाटलीत भरून स्वयंपाकघरातील कपाट आणि स्टोअर रूममध्ये फवारणी करा.

केरोसिनः हा उपाय करण्यासाठी केरोसीन मध्ये कापूस भिजवून कीटकांच्या जागेवर ठेवा. याच्या वासामुळे तुमच्या स्वयंपाकघरात किडे येणार नाहीत.

बोरॅक्सः किचनमधील कपाट आणि स्टोअर रूममधील किटकांपासून सुटका मिळवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. याची पावडर गरम पाण्यात मिक्स करा आणि हे मिश्रण किचनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडा. याच्या तीव्र वासामुळे कीटक काही वेळाने पळून जातील. मात्र, त्याचा वापर करताना मुलांना त्यापासून दूर ठेवा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या