मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  National Anthem: आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले 'जन गण मन', जाणून घ्या राष्ट्रगीताशी संबंधित रंजक गोष्टी!

National Anthem: आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले 'जन गण मन', जाणून घ्या राष्ट्रगीताशी संबंधित रंजक गोष्टी!

Dec 27, 2023, 10:23 AM IST

    • Jan Gan Man: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली.
Jan Gan Man Sang First Time on 27 December (AFP)

Jan Gan Man: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली.

    • Jan Gan Man: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली.

National Anthem Jan Gan Man: जन-गण-मन हे भारताचं राष्ट्रगाण आहे. हे गाण, याची धून प्रत्येक भारतीयांची मानत घर करून आहे. आजच्या दिवशी म्हणजेच २७ डिसेंबर १९११ (history of 27 December)  मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात जन-गण-मन गायले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली. या खास दिनी आपल्या राष्ट्रगीताशी संबंधित १० रंजक गोष्टी जाणून घेऊयात. या गोष्टी कदाचित तुम्हाला फार कमी लोकांना माहित असतील.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

या गोष्टी जाणून घ्या

> जन गण मन हे सर्वात प्रथम त्याचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांची भाची आणि नोबेल पारितोषिक विजेते सरला यांनी गायले होते.

> रवींद्रनाथ टागोर यांनी १९१९ मध्ये बेझंट थिऑसॉफिकल कॉलेज, आंध्र प्रदेश येथे पहिल्यांदा ते गायले

> जानेवारी १९५० रोजी याला 'राष्ट्रगीता'चा दर्जा देण्यात आला.

> रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये जन गण मनाची रचना केली आणि त्याच वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनात ते पहिल्यांदा गायले गेले.

> ११ सप्टेंबर १९४२ रोजी जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात आझाद हिंद फौजेने देशाबाहेर प्रथमच 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून वाजवले.

> १९४५ मध्ये बनलेल्या 'हमराही' चित्रपटात याचा वापर करण्यात आला होता.

> राष्ट्रगीत गाण्यासाठी ५२ सेकंद लागतात. त्याची पहिली आणि शेवटची ओळ गाण्यासाठी २० सेकंद लागतात.

> कायद्यानुसार कोणालाही राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करता येत नाही.

> राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा-१९७१ च्या कलम ३ अन्वये राष्ट्रगीताचे नियम न पाळणाऱ्या आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

> 'जन गण मन' हे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्र नाथ टागोर यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीतही लिहिले आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही.)

पुढील बातम्या