मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Lotion: थंडीत त्वचेला ड्रायनेसपासून वाचवायचे असेल तर घरी बनवा बॉडी लोशन, मिळतील अनेक फायदे

Body Lotion: थंडीत त्वचेला ड्रायनेसपासून वाचवायचे असेल तर घरी बनवा बॉडी लोशन, मिळतील अनेक फायदे

Dec 29, 2022, 02:12 PM IST

    • Skin Care DIY: हिवाळ्यात तुमच्या त्वचेला थंड वाऱ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते कोरडे होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही या खास पद्धतीने घरी बॉडी लोशन बनवू शकता.
त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी होममेड बॉडी लोशन

Skin Care DIY: हिवाळ्यात तुमच्या त्वचेला थंड वाऱ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते कोरडे होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही या खास पद्धतीने घरी बॉडी लोशन बनवू शकता.

    • Skin Care DIY: हिवाळ्यात तुमच्या त्वचेला थंड वाऱ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते कोरडे होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही या खास पद्धतीने घरी बॉडी लोशन बनवू शकता.

Homemade Body Lotion for Dry Skin: हिवाळा आला की ड्राय, डल त्वचेची समस्या वाढू लागते. दिवसातून अनेक वेळा त्वचेला मॉइश्चराइझ करावे लागते. हे कमी करण्यासाठी बॉडी लोशन एक उत्तम पर्याय आहे. बाजारात मिळणारे सर्व प्रोडक्ट उपयुक्त ठरतीलच हे सांगता येत नाही. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या, कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती बॉडी लोशन वापरु शकता. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी बॉडी लोशन कसे तयार करावे.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

एलोवेरा आणि कोकोनट ऑइलने बनवा बॉली लोशन

एलोवेरा आणि कोकोनट ऑइल बॉडी लोशन तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये ८ ते १० चमचे एलोवेरा जेल घ्या. आता त्यात ५ चमचे खोबरेल तेल मिक्स करा. पुढच्या स्टेपमध्ये व्हिटॅमिन-ईच्या ५ ते ६ कॅप्सूल आणि ४ चमचे ग्लिसरीन घाला. आता तुम्हाला ६ चमचे गुलाबजल आणि तुमच्या आवडत्या इसेंशियल ऑइलचे काही थेंब घालून क्रीमी मिश्रण तयार करायचे आहे. जर लोशन खूप पातळ असेल तर त्यात ४ चमचे कॉर्न फ्लोअर मिक्स करा आणि ब्लेंडरने ब्लेंड करा. तुम्हाला दिसेल की हे बॉडी लोशन बाजारातील बॉडी लोशनसारखे क्रीमी झाले आहे. आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ते तुमच्या संपूर्ण शरीरावर वापरू शकता.

होममेड बॉडी लोशनचे फायदे

- जर तुम्हाला दुखापत झाली असेल तर या लोशनचा वापर केल्याने जखम बरी होण्यास मदत होईल. एलोवेरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-बी१२ मुबलक प्रमाणात आढळतात. जे त्वचेतील कोलेजन वाढवण्यासोबतच जखमा भरण्यास मदत करते.

- होममेड बॉडी लोशनमध्ये व्हिटॅमिन-ई, खोबरेल तेल आणि ग्लिसरीन आणि कोरफडीचा वापर केला गेला आहे. ज्यामुळे ते तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासोबतच मॉइश्चराइझ करेल.

- कोरफडमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे इंफेक्शन आणि खाज सुटण्याची समस्या दूर होते.

- या बॉडी लोशनचा वापर केल्यास लालसरपणा आणि बॅक्टेरियल इंफेक्शनची समस्या होणार नाही.

- कोरफड आणि खोबरेल तेलाच्या बॉडी लोशनच्या वापराने तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहील. खोबरेल तेल त्वचेची टॅनिंग कमी करून त्वचा मऊ करेल. व्हिटॅमिन-ई निस्तेज त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या