मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Care In Diwali: दिवाळीत 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी! बाळगा सावधपणा

Eye Care In Diwali: दिवाळीत 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी! बाळगा सावधपणा

Oct 22, 2022, 02:43 PM IST

    • हात व बोटे या सोबत फटाक्यांचा परिणाम डोळ्यांवरच होतो. दरवर्षी मोठ्या संख्येने फटाक्यांमुळे अनेकांना डोळ्यांना दुखापत होते.
दिवाळीत घ्या डोळ्यांची काळजी (Freepik)

हात व बोटे या सोबत फटाक्यांचा परिणाम डोळ्यांवरच होतो. दरवर्षी मोठ्या संख्येने फटाक्यांमुळे अनेकांना डोळ्यांना दुखापत होते.

    • हात व बोटे या सोबत फटाक्यांचा परिणाम डोळ्यांवरच होतो. दरवर्षी मोठ्या संख्येने फटाक्यांमुळे अनेकांना डोळ्यांना दुखापत होते.

दीपावली ही जशी फराळाशिवाय अपूर्ण आहे तसेच ती दिवे आणि फटाके याशिवाय पूर्ण होत नाही. फटाके वाजवण्यासाठी वयाची मर्यादा निश्चितच नसते आणि आतषबाजी तर सर्वांनाच आवडते. परंतु हे करताना अतिरिक्त काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो, फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापती होतात. दृष्टीला होणाऱ्या दुखापती दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवल्या जातात आणि त्या प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात. हात व बोटे या सोबत फटाक्यांचा परिणाम डोळ्यांवरच होतो. फुलबाज्या आणि बॉम्बमुळे बहुतेक दुखापती होतात, तर चक्रांमुळेही काही दुखापती होतात. प्राध्यापक डॉ. एस. नटराजन, प्रमुख, व्हायट्रो रेटिनल सेवा, डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स वर्ल्डवाइड आणि आदित्यज्योत आय हॉस्पिटल, मुंबईतील डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे युनिट यांच्याकडून जाणून घेऊयात दिवाळीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी.

ट्रेंडिंग न्यूज

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

अधिक धोका असलेल्या व्यक्ती

डोळ्याला दुखापत होण्याचा धोका फटाके हाताळणाऱ्यांबरोबरच तेथे नुसत्या उभ्या असलेल्या ५० टक्क्यांहून अधिक लोकांनाही असतो. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही रस्त्यावर वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे दुखापतींचा धोका असतो.

दुखापतीचे प्रकार

नेत्र दुखापतींची तीव्रता सौम्य चुरचुर व नेत्रपटलावर ओरखडा उमटण्यापासून रेटिनाला होणारे गुंतागुंतीचे आजार व अंधत्वाची शक्यता असलेल्या ओपन ग्लोब दुखापतीपर्यंत असू शकते. फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळेही डोळ्यांना दुखापती होतात. सातत्याने धूर येत ऱाहिल्यामुळे डोळे चुरचुरतात आणि त्यातून पाणी येते. फटाक्यांतून येणाऱ्या धुरामुळे लॅरिंजायटिस व अन्य काही प्रकारचे प्रादुर्भाव घशामध्ये होतात. फटाके धोकादायक असतात, कारण, ते सोन्याचे ज्वलन करण्याइतपत उच्च तापमानावर (१,८०००° F) जातात. हे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानाहून सुमारे १,००० अंशांनी अधिक असते, या तापमानात काच वितळते आणि त्वचा तिसऱ्या स्तरापर्यंत (थर्ड डिग्री) भाजून निघू शकते. अशा प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

बहुतेक फटाक्यांमध्ये गन पावडर असते, त्यामुळेच फटाक्यांचा स्फोट होतो. फटाक्यांचे स्फोट बेभरवशाचे असल्यामुळे अगदी काळजी घेऊन किंवा देखरेखीखाली फटाके उडवणाऱ्यांनाही दुखापती होऊ शकतात. दिवाळीच्या काळात प्रदूषणाचा स्तर कळस गाठतो, हवेतील नायट्रोज ऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइडची पातळी लक्षणीयरित्या वाढते.ध्वनीप्रदूषणाचे स्तरही परवानगी घालून दिलेल्या मर्यादांहून बरेच वर जातात. झाडे आणि फुटणारे फटाके यांमध्ये अनेक सुक्ष्म घटक असतात. ते वेगाने पसरतात व उतींचे यांत्रिक स्वरूपाचे नुकसान करतात.

काँटॅक्ट लेन्सेस दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात आल्यास डोळ्यांची चुरचुर होऊ शकते. त्यामुळे काँटॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्यांनी फटाके वाजवताना दुप्पट काळजी घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, फटाक्यामुळे डोळ्यांचे होणारे नुकसान हे फटाक्याचा वेग किंवा त्यांची डोळ्यावर आदळण्याची तीव्रता, डोळ्याशी होणारी रासायनिक प्रक्रिया व उष्णतेमुळे किती प्रमाणात भाजले गेले आहे यांवर अवलंबून असते.

‘हे’ करा आणि ‘हे’ करू नका

■ डोळे चोळू नका किंवा त्यावर ओरखडे येऊ देऊ नका.

■ डोळे आणि चेहरा व्यवस्थित धुवा.

■ डोळ्यांची चुरचुर होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार पाण्याचे शिपके द्या.

■ बाह्यघटक मोठा असेल किंवा डोळ्यात चिकटला असेल, तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका.

■ डोळे मिटलेले ठेवा आणि नेत्रविकारतज्ज्ञांकडे जा.

■ डोळ्यात कोणतेही रसायन गेले असेल, तर तत्काळ डोळे व पापण्यांभवतीचा भाग पाण्याने ओला करा आणि ३० मिनिटे पाणी लावत राहा. तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांना दाखवा.

'अशी' घ्या काळजी

■ फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा.

■ लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा व प्रोफेशनल मदत घ्या.

■ अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली व वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा.

■ फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.

■ फटाके चेहरा, केस व कपड्यांपासून दूर ठेवा.

■ फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका.

■ फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.

■ फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.

■ फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा.

■ जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम फुटवेअर वापरा.

 

पुढील बातम्या