मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  इव्हनिंग स्नॅक्समध्ये बनवा कॉकटेल समोसा आणि वाढवा चहाची मजा

इव्हनिंग स्नॅक्समध्ये बनवा कॉकटेल समोसा आणि वाढवा चहाची मजा

Sep 22, 2022, 05:41 PM IST

    • Tea Time Snacks Recipe : संध्याकाळच्या चहासोबत गरमा गरम समोसे खायला प्रत्येकालाच आवडतात. नेहमीच्या बटाट्याच्या समोसा ऐवजी ट्राय करा कॉकटेल समोसा.
कॉकटेल समोसा

Tea Time Snacks Recipe : संध्याकाळच्या चहासोबत गरमा गरम समोसे खायला प्रत्येकालाच आवडतात. नेहमीच्या बटाट्याच्या समोसा ऐवजी ट्राय करा कॉकटेल समोसा.

    • Tea Time Snacks Recipe : संध्याकाळच्या चहासोबत गरमा गरम समोसे खायला प्रत्येकालाच आवडतात. नेहमीच्या बटाट्याच्या समोसा ऐवजी ट्राय करा कॉकटेल समोसा.

Cocktail Samosa Recipe : चहा आणि समोसा हे कॉम्बिनेशन काही नवीन नाही. त्यांची जोडी खूप जुनी आहे. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण वाटतात. तुम्ही समोस्यांच्या वेगवेगळ्या चवी चाखल्या असतील, पण कॉकटेल समोस्यांची चव वेगळी आहे. हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे कॉकटेल समोसे.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

कॉकटेल समोसा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- मैदा

- गव्हाचे पीठ

- बटाटे (उकळलेले)

- कांदा

- हिरवे वाटाणे

- आले-लसूण पेस्ट

- हिरवी मिरचीची पेस्ट

- कोथिंबीर

- लाल तिखट

- आमचूर पावडर

- गरम मसाला

- साखर (बारीक केलेली)

- मीठ

- तेल

 

कॉकटेल समोसा बनवण्याची पद्धत

कॉकटेल समोसा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा आणि गव्हाचे पीठ समान प्रमाणात मिक्स करून त्यात साखर पावडर, मीठ, तेल आणि पाणी घालून मऊ कणकेप्रमाणे मळून घ्या आणि ३० मिनिटे बाजूला ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात कोथिंबीर घालून मिक्स करा. आता १ चमचा आले-लसूण पेस्ट घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट टाकून नीट मिक्स करा आणि नंतर कांदा घालून चांगले शिजवा. आता त्यात हिरवे वाटाणे घालून ३ ते ५ मिनिटे शिजू द्या. यानंतर लाल तिखट, आमचूर पावडर आणि मीठ टाकून मिक्स करा. नंतर ५०० ग्रॅम उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे टाकून मिक्स करा आणि ३ ते ५ मिनिटे शिजवा. शिजल्यावर त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालून बाजूला ठेवा.

आता मळलेल्या पिठाचा काही भाग घ्या आणि गोळा बनवा आणि त्यावर गव्हाचे पीठ शिंपडा. लाटण्याने पोळीसारखे लाटून घ्या. नंतर त्यास आयताकार आकार देण्यासाठी सर्व बाजूंनी कापून घ्या. तवा गरम करा आणि ही शीट १० सेकंद भाजा. आता ते उलटं करून १० सेकंद बेक करा आणि बाजूला काढून एका बोर्डवर ठेवा. एका वाटीत २ टिस्पून मैदा आणि २ चमचे पाणी घालून पेस्ट तयार करा.

आता तयार बटाट्याचे मिश्रण शीटवर ठेवा आणि त्रिकोणाच्या आकारात रोल करा. आता त्याच्या कडा पूर्णपणे बंद करण्यासाठी, त्यावर तयार पेस्ट लावा आणि बंद करा. कढईत पुरेसे तेल गरम करून ते सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढा. तुमचे कॉकटेल समोसे तयार आहेत. आता सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

 

विभाग

पुढील बातम्या