मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  शुगरची चिंता सोडा अन् अंजीर टाकून बनवा रव्याचा शिरा

शुगरची चिंता सोडा अन् अंजीर टाकून बनवा रव्याचा शिरा

May 29, 2022, 08:23 PM IST

    • जेवणानंतर स्विट डिश असेल तर जेवणाचा आनंद डबल होतो. पण तुम्हाला शुगर वाढण्याची चिंता असेल तर अजिबात काळजी करू नका. हा शुगर फ्री शिरा ट्राय करा. पहा कसा बनवायचा अंजीर टाकून रव्याचा शिरा.
रव्याचा अंजीर टाकून शुगर फ्री शिरा

जेवणानंतर स्विट डिश असेल तर जेवणाचा आनंद डबल होतो. पण तुम्हाला शुगर वाढण्याची चिंता असेल तर अजिबात काळजी करू नका. हा शुगर फ्री शिरा ट्राय करा. पहा कसा बनवायचा अंजीर टाकून रव्याचा शिरा.

    • जेवणानंतर स्विट डिश असेल तर जेवणाचा आनंद डबल होतो. पण तुम्हाला शुगर वाढण्याची चिंता असेल तर अजिबात काळजी करू नका. हा शुगर फ्री शिरा ट्राय करा. पहा कसा बनवायचा अंजीर टाकून रव्याचा शिरा.

असं म्हणतात की, जी गोष्ट खाण्यापासून रोखली जाते किंवा जे काम करायला मनाई आहे, अनेकदा ते काम करण्यासाठी मन जास्त करते. गोड आरोग्यासाठी हानिकारक आहे पण तरीही लोकांना ते खायला खूप आवडते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री रव्याच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही अंजीर मिक्स करून बनवू शकता. अंजीर आणि इतर ड्रायफ्रुट्स टाकून हा शिरा खूप चविष्ट बनतो. चला तर जाणून घ्या कसा बनवायचा हा हेल्दी आणि टेस्टी शिरा

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

साहित्यः

- अंजीर

- खजूर

- बदाम

- काजू

- खारीक

- तूप

- रवा

- शुगर फ्री

- किशमिश

- वेलची पूड

- पाणी

 

विधीः

सर्वप्रथम एका वाटीमध्ये अंजीर, खजूर यात पाणी टाकून ते साधारण २ ते ३ तासासाठी भिजवून ठेवा. एका पॅन मध्ये तूप गरम करा आणि त्यात बदाम, काजू, खारीक टाकून मध्यम आचेवर साधारण ३ ते ५ मिनीट भाजून घ्या. आता हे काढून घ्या आणि मिक्स करून ग्राइंडरमध्ये थोडे जाडसर बारीक करा. आता यात भिजवलेले अंजीर आणि खजूर टाका आणि चांगले ब्लेंड करून घ्या. हे सर्व एका बाजूला ठेवून द्या.

एका पॅन मध्ये थोडेसे तूप घेऊन गरम करा. त्यात रवा टाका आणि मध्यम आचवर साधारण ८ ते १० मिनीट भाजून घ्या. रवा नीट भाजल्यावर त्यात पाणी टाका आणि मिक्स करून घ्या. हे साधारण ३ ते ५ मिनीट मध्यम आचेवर शिजवा. आता यात शुगर फ्री आणि ब्लेंड केलेली अंजीरची पेस्ट टाका आणि चांगले मिक्स करा. यात मिक्स केलेले ड्रायफ्रूट्स, किशमिश व वेलची पूड टाका आणि मिक्स करा. साधारण २ ते ३ मिनीट मध्यम आचवर शिजू द्या. तुमचा शिरा तयार आहे. गॅस बंद करा. सर्व्हिंग प्लेट मध्ये शिरा काढा आणि बदाम, ड्रायफ्रुट्सने गार्निश करून सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या