मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stuffed Mirchi Pakode Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा बटाटा स्टफ मिरची पकोडे!

Stuffed Mirchi Pakode Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा बटाटा स्टफ मिरची पकोडे!

Oct 22, 2022, 09:56 AM IST

    • Weekend Special: संध्याकाळचा चहा असो किंवा पार्टी स्टार्टर, दोन्हीसाठी तुम्ही चविष्ट बटाटा मिर्ची पकोडे बनवू शकता
बटाटा मिरची पकोडा

Weekend Special: संध्याकाळचा चहा असो किंवा पार्टी स्टार्टर, दोन्हीसाठी तुम्ही चविष्ट बटाटा मिर्ची पकोडे बनवू शकता

    • Weekend Special: संध्याकाळचा चहा असो किंवा पार्टी स्टार्टर, दोन्हीसाठी तुम्ही चविष्ट बटाटा मिर्ची पकोडे बनवू शकता

वातावरण थोडं थंड झालं की गरमागरम चहासोबत पकोडे खायला मजा येते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पकोडे बनवतो. वेगवेगळ्या भाज्यांशिवाय मिरचीची पकोडेही छान लागतात. आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे सारण भरून मिरची पकोडा बनवण्याची रेसिपी सांगत आहोत. अशा प्रकारे बनवलेले पकोडे चहाच्या वेळी खाण्यासाठी एकदम बेस्ट आहेत. याशिवाय घरी होणाऱ्या पार्टीतही तुम्ही हे पकोडे बनवू शकतो. या रेसिपीसाठी आधी तयारी केल्यास आयत्यावेळी पकोडे तयार केले जाऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

पकोडे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- जाड मिरची

- उकडलेले बटाटे

- बेसन

- ओवा

- मीठ

- मिरची पावडर

- गरम मसाला पावडर

- आमचूर पावडर

- चाट मसाला

- ताजी काळी मिरी

- बडीशेप

- कोथिंबीर

- तेल

कसे बनवावे पकोडे?

१) पकोडे बनवण्यासाठी प्रथम मिरची नीट धुवून मधून एक कट लावून घ्या आणि मिरची बाजूला ठेवा.

२) आता बटाट्याचे सारण बनवायला सुरु करा, त्यासाठी उकडलेल्या बटाट्यांमध्ये मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, बडीशेप आणि आमचूर पावडर घाला. नीट मिक्स करून त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला. बटाट्याचे सारण तयार आहे.

३) बेसन तयार करण्यासाठी एका भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात मीठ, ओवा, लाल तिखट, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला घाला. ४. ४) प्रथम कोरड्या गोष्टी मिक्स करा आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला. मिश्रण थोडे घट्ट ठेवा म्हणजे मिरच्या चांगल्या कव्हर होतील.

५) कढईत तेल गरम करा आणि तेल गरम होईपर्यंत सर्व मिरच्यांमध्ये बटाट्याचे सारण भरा.

६) तेल गरम झाल्यावर प्रत्येक मिरची बेसनाच्या पिठात बुडवून नंतर तेलात सोडा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि नंतर चटणीबरोबर सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या