मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चटपटीत आलू टिक्की, चहाची मजा वाढवेल ही रेसिपी

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चटपटीत आलू टिक्की, चहाची मजा वाढवेल ही रेसिपी

Sep 22, 2023, 06:39 PM IST

    • Evening Snacks Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खायचं असेल तर स्ट्रीट स्टाईल आलू टिक्कीची ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.
आलू टिक्की (unsplash)

Evening Snacks Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खायचं असेल तर स्ट्रीट स्टाईल आलू टिक्कीची ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.

    • Evening Snacks Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खायचं असेल तर स्ट्रीट स्टाईल आलू टिक्कीची ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे.

Street Style Aloo Tikki Recipe: जर तुम्ही संध्याकाळी तुमची भूक भागवण्यासाठी काही चटपटीत पर्याय शोधत असाल, तर तुम्ही क्रिस्पी आलू टिक्कीची ही टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी फक्त तुमची भूक भागवणार नाही तर चहाची मजा सुद्धा डबल करेल. ही रेसिपी फक्त खायला चविष्ट नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया स्ट्रीट स्टाईल क्रिस्पी आलू टिक्की कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य

- ४ उकडलेले बटाटे

- २ टेबल स्पून कॉर्न फ्लोअर

- १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

- १-२ हिरव्या मिरच्या

- २-३ चमचे कोथिंबीर

- १/२ टीस्पून जिरेपूड

- १/२ टीस्पून चाट मसाला

- १/४ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची

- २ टेबलस्पून पुदिना

- १/२ टीस्पून आमचूर पावडर

- तळण्यासाठी तेल

-चवीनुसार मीठ

आलू टिक्की बनवण्याची पद्धत

क्रिस्पी आलू टिक्की बनवण्यासाठी प्रथम उकडलेले बटाटे किसून घ्या. आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि एका बाऊलमध्ये किसलेल्या बटाट्यासह ठेवा. यानंतर बटाट्यात आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिक्स करून घ्या आणि त्यात जिरेपूड, आमचूर पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून मिक्स करा. आता या मिश्रणात २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर किंवा तांदळाचे पीठ घालून बटाट्याबरोबर चांगले मिक्स करा. आता या मिश्रणाचे गोळे हाताला थोडे तेल लावून दोन्ही तळहातांनी दाबून टिक्कीचा आकार द्या. अशाच प्रकारे संपूर्ण मिश्रणातून टिक्की बनवून प्लेटमध्ये ठेवा. 

आता कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याच्या टिक्की तळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तव्यावर ठेवून शॅलो फ्रायही करू शकता. बटाट्याच्या टिक्की सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढा. तुमची टेस्टी आलू टिक्की तयार आहे. हिरवी चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

पुढील बातम्या