मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Burger Recipe: घरी स्ट्रीट स्टाईल आलू टिक्की बर्गर बनवणे आहे सोपे, स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट रेसिपी

Burger Recipe: घरी स्ट्रीट स्टाईल आलू टिक्की बर्गर बनवणे आहे सोपे, स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट रेसिपी

Oct 12, 2023, 06:45 PM IST

    • Street Style Recipe: बर्गर खायला सर्वांनाच आवडते. संध्याकाळच्या स्नॅक्स टाइममध्ये हे आवडीने खाल्ले जाते. तुम्ही हे घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. पाहा ही रेसिपी
आलू टिक्की बर्गर (unsplash)

Street Style Recipe: बर्गर खायला सर्वांनाच आवडते. संध्याकाळच्या स्नॅक्स टाइममध्ये हे आवडीने खाल्ले जाते. तुम्ही हे घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. पाहा ही रेसिपी

    • Street Style Recipe: बर्गर खायला सर्वांनाच आवडते. संध्याकाळच्या स्नॅक्स टाइममध्ये हे आवडीने खाल्ले जाते. तुम्ही हे घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. पाहा ही रेसिपी

Aloo Tikki Burger Recipe: लहान मुले असो वा मोठे प्रत्येकाला संध्याकाळी थोडी भूक लागते. अशा वेळी तुम्ही काहीतरी चटपटीत स्नॅकचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही ही स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की बर्गरची रेसिपी ट्राय करू शकता. बर्गर हे एक स्ट्रीट फूड आहे जे लहान मुले आणि मोठे दोघांनाही आवडते. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे हे टेस्टी असण्यासोबतच कमी वेळात तयार होते. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आलू टिक्की बर्गर कसा बनवायचा.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

आलू टिक्की बर्गर बनवण्यासाठी साहित्य

- १ बर्गर बन

- १/४ कप उकडलेले मटार

- १/४ कप उकडलेले बटाटे

- १/२ कप मैदा

- १ लेट्यूस पान

- १/२ कप ब्रेड क्रम्बस

- ४- ५ कांद्याच्या रिंग

- २- ३ टोमॅटोचे स्लाइस

- १/२ टीस्पून आले लसूण पेस्ट

- १/४ टीस्पून काळी मिरी

- १/४ टीस्पून लाल तिखट

- १/२ टीस्पून धने पावडर

- २ टीस्पून मेयोनीज

- २ टीस्पून टोमॅटो सॉस

- चवीनुसार मीठ

आलू टिक्की बर्गर बनवण्याची कृती

आलू टिक्की बर्गर बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे, वाटाणे, आले लसूण पेस्ट, मीठ, तिखट, जिरे पूड, धने पावडर घालून सर्व चांगले मिक्स करा. आता या मिश्रणापासून टिक्की बनवा. एका बाउलमध्ये मैद्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली टिक्की मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवा नंतर ब्रेड क्रम्बमध्ये कोट करा आणि तेलात तळा. आता मेयोनीज आणि टोमॅटो सॉस एकत्र मिक्स करा. बर्गर बन घ्या. त्याच्या दोन्ही बाजूंनी मेयोनेझ आणि सॉसचे मिश्रण लावा. लेट्यूसचे पान ठेवा आणि त्यावर टिक्की ठेवा. टिक्कीच्या वर कांद्याचे रिंग आणि टोमॅटोचे स्लाइस ठेवा. आता वर बनचा दुसरा भाग ठेवा. तुमचा चविष्ट आलू टिक्की बर्गर तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या