मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Paneer Kathi Roll: घरी सोप्या पद्धतीने बनवा पनीर काठी रोल, टेस्टी आहे ही स्ट्रीट फूड रेसिपी

Paneer Kathi Roll: घरी सोप्या पद्धतीने बनवा पनीर काठी रोल, टेस्टी आहे ही स्ट्रीट फूड रेसिपी

Oct 03, 2023, 07:36 PM IST

    • Street Food: जर तुम्ही स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. स्ट्रीट फूडसारखे पनीर काठी रोल घरी बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी.
पनीर काठी रोल (Freepik)

Street Food: जर तुम्ही स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. स्ट्रीट फूडसारखे पनीर काठी रोल घरी बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी.

    • Street Food: जर तुम्ही स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. स्ट्रीट फूडसारखे पनीर काठी रोल घरी बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी.

Paneer Kathi Roll Recipe: संध्याकाळची छोटीशी भूक भागवण्यासाठी आपल्याला अनेकदा काहीतरी चटपटीत खायला आवडते. ज्यासाठी स्ट्रीट फूड बहुतेक लोकांची पहिली पसंती असते. स्ट्रीट फूड खाण्याची आवड असलेल्या लोकांना मोमोज, चाट किंवा काठी रोल खायला आवडते. जर तुम्हीही स्ट्रीट फूडचे शौकीन असाल, तर स्ट्रीट फूडची तुमची क्रेविंग लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला स्ट्रीट फूडसारखे चविष्ट पनीर काठी रोल घरी कसा बनवायचे ते सांगत आहोत. चला जाणून घेऊया त्याची सोपी आणि टेस्टी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

पनीर काठी रोल बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्राम पनीरचे चौकोनी तुकडे

- २ लाल-पिवळी शिमला मिरची

- १/२ चमचा आले-लसूण पेस्ट

- हिरवी चटणी

- मेयोनीज

- टोमॅटो सॉस

- २ चमचे दही

- १ चमचा कसुरी मेथी

- १ चमचा लिंबाचा रस

- १ चमचा काश्मिरी लाल मिरची

- १/२ चमचा गरम मसाला

- १/२ चमचा हळद

- १ चमचा तेल

- १ चमचा लोणी

- २ पराठे

- चवीनुसार मीठ

पनीर काठी रोल बनवण्याची पद्धत

स्ट्रीट स्टाईल पनीर काठी रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे चौकोनी तुकडे मॅरीनेट करावे लागतात. यासाठी पनीरमध्ये सर्व मसाले मिक्स करा. हे मॅरीनेट होण्यासाठी ३० मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात सिमला मिरची, कांदा, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला आणि पनीर घालून हलके परतून घ्या. आता पराठा तयार करा. त्यात हिरवी चटणी लावा. त्यातवर तयार केलेले पनीरचे मिश्रण, मेयोनीज आणि सॉस टाका. नंतर वर कांद्याच्या रिंग टाका आणि रोल करा. तुमचा चविष्ट पनीर काठी रोल तयार आहे. चटणीसोबत सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या