मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सर्वांनाच आवडेल हे स्ट्रीट फूड फ्यूजन, ट्राय करा समोसा पिझ्झा चाट

सर्वांनाच आवडेल हे स्ट्रीट फूड फ्यूजन, ट्राय करा समोसा पिझ्झा चाट

Jul 11, 2022, 05:41 PM IST

    • संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत खायची क्रेव्हिंग होते. तुम्हाला सुद्धा काही तरी चाट खाण्याची इच्छा असेल तर समोसा पिझ्झा चाट बनवून पहा.
समोसा पिझ्झा चाट

संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत खायची क्रेव्हिंग होते. तुम्हाला सुद्धा काही तरी चाट खाण्याची इच्छा असेल तर समोसा पिझ्झा चाट बनवून पहा.

    • संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत खायची क्रेव्हिंग होते. तुम्हाला सुद्धा काही तरी चाट खाण्याची इच्छा असेल तर समोसा पिझ्झा चाट बनवून पहा.

Samosa Pizza Chaat Recipe: जेव्हा फेमस इंडियन स्ट्रीट फूडचा विचार केला जातो तेव्हा समोसा आणि चाट यांचे नाव नक्कीच घेतले जाते. संध्याकाळच्या चहासोबत दिल्या जाणाऱ्या या दोन्ही गोष्टी तुमचा मूड चांगला करण्यासाठी पुरेशा आहेत. पण आजचा विषय समोसा किंवा चाट बद्दल नसून या दोघांच्या फ्युजनमधून तयार झालेल्या समोसा पिझ्झा चाट बद्दल असणार आहे. समोसा पिझ्झा चाट लहान मुले असो वा मोठे, सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडते. विशेष म्हणजे ही चविष्ट रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसा बनवायचा समोसा पिझ्झा चाट.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

समोसा पिझ्झा चाट बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- 2 पिझ्झा क्रस्ट

- 4 समोसे (रेडीमेड)

- कप मोझरेला चीज (किसलेले)

 

टॉपिंगसाठी साहित्य

- चिंच खजूरची आंबट गोड चटणी

- हिरवी चटणी

- गोड दही

- चाट मसाला

- कोथिंबीर

- कांदा (बारीक चिरून)

- १/४ कप बारीक सेव

 

समोसा पिझ्झा चाट बनवण्याची विधीः

समोसा पिझ्झा चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम ओव्हन प्रीहीट करा. यानंतर बेकिंग ट्रेवर पार्चमेट शीट लावून पिझ्झा क्रस्ट ठेवा. आता समोसे क्रश करून पिझ्झा क्रस्टवर पसरवून ठेवा. त्यानंतर आता त्यावर किसलेले चीज स्प्रेड करा. आता हे ओव्हनमध्ये ठेवा. चीज वितळेपर्यंत बेक करावे. ओव्हनमधून काढा आणि पिझ्झा थंड होऊ द्या. पिझ्झा कटरने पिझ्झाचे तुकडे करा. चवीनुसार गोड-तिखट चटणी, दही आणि चाट मसाला घाला. तुमचा चविष्ट समोसा पिझ्झा चाट तयार आहे. त्यावर कोथिंबीर, कांदे आणि शेव टाकून सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या