मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Red Chutney Recipe:'ही' लाल चटणी म्हणजे प्रत्येक दक्षिण भारतीय पदार्थाचा जीव! जाणून घ्या सोपी रेसिपी

Red Chutney Recipe:'ही' लाल चटणी म्हणजे प्रत्येक दक्षिण भारतीय पदार्थाचा जीव! जाणून घ्या सोपी रेसिपी

Sep 24, 2022, 12:28 PM IST

    • South Indian Chutney Recipe: दक्षिण भारतीय डोसा, इडली किंवा वडा यासारख्या पदार्थांसोबत ही चटणी आवर्जून सर्व्ह केली जाते.
दक्षिण भारतीय पदार्थ

South Indian Chutney Recipe: दक्षिण भारतीय डोसा, इडली किंवा वडा यासारख्या पदार्थांसोबत ही चटणी आवर्जून सर्व्ह केली जाते.

    • South Indian Chutney Recipe: दक्षिण भारतीय डोसा, इडली किंवा वडा यासारख्या पदार्थांसोबत ही चटणी आवर्जून सर्व्ह केली जाते.

डोसा, इडली किंवा वडा यासारख्या पदार्थांसोबत दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये ३ प्रकारच्या चटण्या पाहायला मिळतात. सगळ्यांना माहीत असलेली पांढरी चटणी नारळाची असते. दुसरी हिरवी चटणी कोथिंबीरीची असते आणि एक लाल चटणी आहे ज्याची चव अनेकांना आवडते. पण ती नक्की कशापासून बनवतात, कशी बनवतात ते माहित नसतं. ही चटणी मसालेदार आणि थोडी गोड असते. ही चटणी कशी बनवायची हे माहित नसेल तर तुम्ही येथे सांगितलेली रेसिपी वापरून पाहू शकता. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे. चटणी बनवण्यासाठी काय आवश्यक आहे आणि कशी बनवायची ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

साहित्य

दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून

एक मध्यम कांदा चिरलेला

चिंचेचे पाणी

काश्मिरी लाल मिरची - तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. जर तुम्ही सामान्य मसालेदार खाल्ले तर २ मिरच्या ठीक नाहीतर तुम्ही जास्त घेऊ शकता.

मीठ

जिरे

हळद

कढीपत्ता

मोहरीचे तेल

मोहरी

उडदाची डाळ

कशी बनवायची चटणी?

कढईत मोहरीचे तेल गरम करा. सर्व प्रथम काश्मिरी लाल मिरची घाला. या मिरच्यांचा रंग बदलू लागला की बाहेर काढा. आता कढईत जिरे टाका. जिरे तडतडले की कांदा घाला. कांदा रंग बदलू लागला की त्यात टोमॅटो घाला. यानंतर हळद, मीठ, कढीपत्ता घाला. आता ते शिजेपर्यंत सुमारे १० मिनिटे शिजवा. आता त्यात चिंचेचे पाणी घाला. गॅस बंद करून थंड होऊ द्या. आता त्यात भाजलेली काश्मिरी लाल मिरची घालून बारीक करा. जर पेस्ट कोरडी वाटत असेल तर ब्लेंडरमध्ये १-२ चमचे पाणी घाला. बारीक झाल्यावर एका भांड्यात काढा. 

तडका

एक टेम्परिंग पॅन घ्या. त्यात तेल टाकून गरम करा. प्रथम उडीद डाळ घाला. जर ते तडतडायला लागले आणि रंग बदलला की मोहरी घाला. मोहरी तडतडायला लागली की हे तडका चटणीत घाला. तुमची टेस्टी दक्षिण भारतीय चटणी तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या